10 May 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त
x

Multibagger Stocks | 1 वर्षात 300 टक्के परतावा दिला, तुम्ही किती काळ संयम पाळू शकता? हा शेअर खरेदी करावा का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | कापड उद्योगाशी संबधित असलेल्या या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली आहे. या कंपनीचे नाव आहे,”Filatex Fashions”. या कंपनीचे शेअर्स 4 टक्के पेक्षा अधिक वाढीसह 18.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सची उच्चांक पातळी किंमत 18.15 रुपये आहे. Filatex Fashions कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

कंपनीच्या शेअरची वाटचाल :
Filatex कंपनीच्या शेअर्सनी मागील.एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 330 टक्के पेक्षा अधिक परतावा कमवून दिला आहे. फिलाटेक्स फॅशन्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 330 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 4.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 18.10 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. जर तुम्ही वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.31 लाख रुपये झाले असते.

आतापर्यंत दिला 150 टक्के परतावा :
भारतीय फॅशन ब्रँड Filatex Fashions कंपनीने नुकताच एका श्रीलंकन ​​फॅशन कंपनी Isabella Private Limited मधील 51 टक्के वाटा खरेदी केला आहे. फिलाटेक्स फॅशन्स कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षात आपल्या शेअर धारकांना 150 टक्के परतावा मिळवू दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी फिलाटेक्स फॅशन्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 7.22 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी FilaTex कंपनीचे शेअर्स 18.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 128 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, Filatex Fashions कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावलेल्या लोकांना 49 टक्के परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of FilaTex Fashion share price return on investment on 05 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x