4 May 2024 10:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Investment Tips | होय इतकी कमी गुंतवणूक, फक्त 71 रुपये जमा करत राहा आणि मॅच्युरिटीला मिळेल 48.75 लाख परतावा, डिटेल वाचा

Investment Tips

Investment Tips | भारतात बहुतेक लोक गुंतवणुक करताना सुरक्षित आणि हमी परतावा देणाऱ्या पर्यायात पैसे लावतात. यासाठी लोक एकतर LIC ची एखादी पॉलिसी योजना घेतात किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्यातरी योजनेत पैसे लावतात, ज्यातून थोडाफार परतावा ते कमवू शकतात. आज रोखत आम्ही तुम्हाला LIC च्या एका जबरदस्त प्लानबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 71 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर 48.75 लाख रुपये परतावा कमवू शकता. आपण ज्या योजनेबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,”LIC न्यू एंडोमेंट प्लॅन”.

गुंतवणूकीची वयोमर्यादा :
LIC च्या या योजनेत गुंतवणूक करून लाभ मिळवण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे, आणि कमाल वय 52 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या गुंतवणूक योजनेची ​​खास गोष्ट म्हणजे ही योजना खूप विचार करून अशा प्रकारे बनवली गेली आहे की, जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती त्याच्या करिअरच्या सुरुवातीला जर गुंतवणूक करण्यास सुरुवात करेल तर ही योजना त्याला भविष्यात अप्रतिम परतावा कमावून देईल.

गरजेनुसार कालावधी निवडा :
LIC न्यू एंडोमेंट प्लॅन या योजनेतील परिपक्वता कालावधी 12 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार आपल्या पॉलिसीचा कालावधी निवडू शकते. जर तुम्ही तुमच्या करिअरची नुकताच सुरुवात केली असेल तर, तुझी या प्लॅनमध्ये 35 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. आणि जर तुमचे वय 45+ असेल तर तुम्ही योजनेत पुढील 12 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता.

सोयीनुसार निवडा प्रीमियम मोड :
जर समजा या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे असेल, आणि त्याने 10 लाखांच्या सम अॅश्युअर्डसाठी LIC न्यू एंडोमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर, त्याचा योजना परिपक्व होण्याचा कार्यकाळ 35 वर्ष असेल. या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 26,534 रुपये वार्षिक प्रीमियम जमा करावा लागेल, तर दुसऱ्या वर्षीचा तुमचा प्रीमियम 25,962 रुपये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे जमा करण्यासाठी त्रैमासिक किंवा वार्षिक असे दोन पर्याय दिले जातील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा प्रिमियम मोड पर्याय निवडू शकता. या प्रीमियमनुसार, जर तुम्ही रोज फकत 71 रुपये जमा केले तर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 48.75 लाख रुपये परतावा म्हणून दिले जातील.

जीवन विमा संरक्षण :
जर या जीवन विमा योजनेतील एखदया ग्राहकाचा प्लॅनच्या मॅच्युरिटीपूर्वीच मृत्यू झाला तर, त्या पॉलिसीधारकाच्या कायदेशीर वारसांना विम्याची पूर्ण रक्कम आणि जीवन संरक्षण लाभ उपलब्ध करून दिले जाईल. तुम्ही LIC च्या या पॉलिसीचा पहिला प्रीमियम भरल्यानंतर लगेच तुम्हाला लाईफ कव्हर उपलब्ध करून दिले जातील. जर समजा पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने नैसर्गिक मृत्यू झाला तर पॉलिसीचा कालावधी आणि प्रीमियमच्या आधारावर त्या व्यक्तीच्या वारसांना 10,45,000 रुपये ते 48,75,000 रुपये पर्यंत रिटर्न्स मिळतील.

मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा :
या जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्ही प्रीमियम म्हणून जी रक्कम जमा कराल ती 9,09,242 रुपये असेल. या रकमेवर कंपनी योजना धारकाला परिपक्वतेच्या वेळी 48,75,000 रुपये परतावा देईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips in LIC New Endowment Plan for Life Cover check details on 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x