
Stocks To Buy | सप्टेंबर 2022 च्या संपलेल्या तिमाहीचे निकाल कंपन्या हळूहळू जाहीर करत आहेत. अशा परिस्थितीत, गुंतवणुकदारांना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून दर्जेदार स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळणार आहे. ब्रोकरेज हाऊसेसने दीर्घकालीन दृष्टीकोन समोर ठेवून असे काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही जोरदार परतावा मिळवू शकता. शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस यांनी हे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 49 टक्के वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
HPCL :
ब्रोकरेज फर्म नुवामा वेल्थने HPCL कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 302 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 203 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. पुढील काही दिवसांत गुंतवणूकदारांनी यात पैसे लावले तर त्यांना प्रति शेअर 99 रुपये म्हणजे 49 टक्के परतावा मिळू शकतो.
मॅक्रोटेक डेव्हलपर्स :
नुवामा वेल्थने या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा वेल्थने या शेअर्सची लक्ष्य किंमत 1,395 रुपये निश्चित केली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 952 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांनी पुढील काळात या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास 443 रुपये किंवा 46 टक्के नफा होऊ शकतो.
कन्साई नेरोलॅक :
ब्रोकरेज फर्म आनंदराठी यांनी कन्साई नेरोलॅक या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म ने त्याची प्रति शेअर 610 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे स्टॉक 448 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी पुढील काळात या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना प्रति शेअर 162 रुपये किंवा 36 टक्के अधिक नफा मिळू शकतो.
दालमिया भारत :
ब्रोकरेज फर्म आनंदाठी यांनी दालमिया भारत कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,742 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म आनंदाठीने या शेअरची लक्ष्य किंमत 2160 रुपये निश्चित केली आहे. सध्या या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे लोक पुढील काळात प्रति शेअर 418 रुपये किंवा 24 टक्के अधिक नफा कमवू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.