28 May 2024 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Hot Stocks | अवघ्या 5 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा देणारे स्टॉक पाहा, झटपट पैसे वाढवण्यासाठी स्टॉक डिटेल वाचून गुंतवणूक करा

Hot Stocks

Hot Stocks | अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार मजबूत कोसळला होता, तर बाजारात किंचित प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. जागतिक आर्थिक मंदी येण्याची शक्यता, अमेरिकेतील बुडत्या बँका, रशिया आणि युक्रेन मधील युद्ध यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारावर दबाव निर्माण केला आहे. अशा काळात ही काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. यापैकी आम्ही तुमच्यासाठी खास पाच शेअर्स निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.

बिनानी इंडस्ट्रीज :
बिनानी इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 83.75 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते. एका आठवड्यात हा स्टॉक 39.89 टक्क्यांनी वाढला आहे अवघ्या 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 19.48 रुपयांवरून वाढून 27.25 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 27.25 रुपयांवर क्लोज झाला होता. तर आज 21 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 29.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.40 लाख परतावा दिला आहे.

धामपूर स्पेशॅलिटीज :
मागील आठवड्यात धामपूर स्पेशॅलिटीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली. या कंपनीचा शेअर काही दिवसात 30.17 रुपयांवरून वाढून 40.39 रुपयांवर पोहोचला होता. अल्पावधीत गुंतवणूकदारांना या कंपनीच्या शेअर्समधून 33.87 टक्के नफा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 31.92 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.33 टक्के वाढीसह 45.49 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रुंगटा इरिगेशन :
रुंगटा इरिगेशन कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 61.26 रुपयांवरून वाढून 78.16 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी झटपट 27.59 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 120.80 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 86.16 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सनशाइन कॅपिटल :
सनशाईन कॅपिटल कंपनीच्या शेअरनेही मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. यालात शेअरची किंमत 38.02 रुपयांवरून वाढून 48.51 रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 27.59 टक्के परतावा कमवला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 63.16 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.93 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

K&R Rail Engineering :
K&R Rail Engineering कंपनीच्या शेअरने देखील मागील आठवड्यात मजबूत कामगिरी केली आहे. एका आठवड्यात हा स्टॉक 314.90 रुपयांवरून वाढून 401.75 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 27.58 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 633.95 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 400.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment and earning short term profit quickly check details on 21 March 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x