14 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीच्या दिशेने, टॉप ब्रोकिंगने पुढच्या टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले? Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का?
x

Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा

Achyut Healthcare Share Price

Achyut Healthcare Share Price | ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ या आरोग्य क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने शनिवारी मोठी खुशखबर जाहीर केली आहे. नुकताच पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी बोनस शेअर वाटप करणार अशा बातम्या येत होत्या, त्यामुळे शेअर मध्ये अचानक खरेदी वाढली. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सतत 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक देत आहेत. (Achyut Healthcare Limited)

18 मार्च 2023 रोजी ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली. या बोनस जारी करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 25 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स देईल.

मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 51.96 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 14, 16, 17 मार्च 2023 रोजी 5-5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर धडक देत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 6 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना 75 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 157.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 51.96 रुपये आहे. तर ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 15 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Achyut Healthcare Share Price 543499 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

Achyut Healthcare Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x