
Multibagger Stock | बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने सोमवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. BLS इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर 1 टक्क्याच्या वाढीसह 338 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
तिमाही नफा :
सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने 356.8 कोटी रुपयेचा परिचालन महसूल कमावला आहे. हा महसूल मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 87 टक्केनी वाढला आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 85 टक्के वाढून 51 कोटी रुपयेपर्यंत गेला आहे. या कंपनीचे जगातील विविध शहरात 12,287 पेक्षा अधिक केंद्रांचे नेटवर्क चालू आहे. कंपनीसाठी 15,000 पेक्षा जास्त कर्मचारी आणि सहयोगी काम करत आहेत आणि कंपनी आपल्या ग्राहकांना कॉन्सुलर, बायोमेट्रिक आणि नागरिक सेवा प्रदान करण्याचे काम करत आहेत.
एका वर्षात 200 टक्के परतावा :
BLS इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 2022 या वर्षात आतापर्यंत जवळपास 256 टक्के वाढली आहे. या वर्षी जानेवारी 2022 पासून आतापर्यंत हा स्टॉक 94 रुपयेवरून 330 रुपयेवर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.