3 May 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

Multibagger Stock | बाब्बो! मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाखावर 1 कोटी परतावा, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

Multibagger Stock

Multibagger Stock | भारतीय शेअर बाजारात असे काही शेअर्स ट्रेड करत आहेत, ज्यांनी दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना ‘सुपर से उपर’ परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वाडिया ग्रुपमधील बिस्किट बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचे नाव देखील सामील आहे. ज्या लोकांनी या कंपनीवर दीर्घकाळ विश्वास दाखवला, त्यांना या कंपनीच्या शेअर्सनी करोडपती बनवले आहे. मागील 26 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 13.47 रुपयांवरून वाढून 4,237 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सप्टेंबर 2022 मधील उत्कृष्ट तिमाही निकालानंतर या कंपनीचे स्टॉक तेजीत धावत सुटले आहेत. सध्या या स्टॉकने आपला सर्वकालीन विक्रमी उच्चांक स्पर्श केला आहे. या कंपनीचे मार्केट कॅपही 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. तिमाही निकालानंतर लगेच दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक खरेदी वाढली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 10 टक्क्यांची अप्रतिम उसळी घेतली होती. मात्र दिवसा अखेर या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली होती. हा स्टॉक NSE निर्देशांकावर 0.86 टक्क्यांच्या कमजोरीसह पडून 4,099.55 रुपयांच्या किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

कंपनीचा व्यवसाय :
FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी ब्रिटानियाचा व्यवसाय सलग 38 तिमाहीत मोठ्या प्रमाणात वाढला असून कंपनीचा बाजारातील वाटा 15 वर्षांच्या विक्रमी उच्चांक पातळीवर गेला आहे. जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 28 टक्क्यांनी वधारला आहे. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ब्रिटानिया कंपनीने 490 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. गुंतवणुक तज्ञांनी या कंपनीच्या बाबतीत 451 कोटी रुपये निव्वळ नफ्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र कंपनीने त्यापेक्षा ही जास्त नफा कमावला आहे.

बंपर परतावा :
Britania कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 26 वर्षात ब्रिटानिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31355 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 72 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 28 टक्क्यांची बंपर वाढ पाहायला मिळाली होती.

33 हजारवर एक कोटी परतावा :
22 मार्च 1996 रोजी ब्रिटानिया कंपनीचे शेअर्स 13.47 रुपयांवर ट्रेड करत होते. नोव्हेंबर 2022 मध्ये या शेअरची किंमत 4,237 रुपये या आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक पातळीवर गेली आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 26 वर्षांपूर्वी फक्त 33,000 रुपये लावले असते तर तो आजच्या ट्रेडिंग किमती नुसार तुम्ही करोडपती झाला असता. सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10,380,178 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Britannia share price return on investment on 12 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x