3 May 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

Money From Shares | पैसा गुंतवावा तर अशा शेअर्सवर, बोनस शेअर्स गुंतवणुकीचा पैसा पटीने वाढवत आहेत, स्टॉक नेम नोट करा

Money From Shares

Money From Shares | मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीचा स्टॉक या आठवड्यात एक्स-बोनसवर ट्रेड करणार आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स एक्स-डेट आधारावर वाटप करणार आहे. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 26,227 कोटी रुपये असून या आठवड्यात बुधवारी 16 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनी एक्स-बोनसवर ट्रेड करणार आहे. सध्या कंपनीचे शेअर 83.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस प्रमाण :
मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीच्या आपल्या विद्यमान शेअरधारकांना बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या पाच शेअर्सवर दोन बोनस शेअर्स मोफत देईल.

कंपनीचे स्पष्टीकरण :
मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, “कंपनीच्या शेअर धारकांच्या नियमानुसार 5 विद्यमान इक्विटी शेअर्सवर 2 इक्विटी बोनस मोफत वाटप केले जातील. 16 नोव्हेंबर 2022 ही तारीख बोनस शेअर्स वाटपाची ‘रेकॉर्ड तारीख’ म्हणून जाहीर करण्यात आली आहे”.

कंपनीचे तिमाही निकाल :
मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाही निकालात 1,835.21 कोटी रुपये महसूल कमावला आहे. चालू आर्थिक वर्ष 2022 मधील महसूल हा गेल्या वर्षीच्या तिमाहीमधील महसूलाच्या तुलनेत 31 टक्क्यांनी अधिक आहे. या स्मॉल-कॅप कंपनीने तिमाही-दर-तिमाही 9.83 टक्के महसूल वाढ नोंदवली आहे. तथापि, कंपनीचा EBITDA मार्जीन वार्षिक 2 टक्क्यांनी कमी झालेला पाहायला मिळतो. कंपनीचा EBIDTA मार्जीन आर्थिक वर्ष 2022 मध्ये 194 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Motherson Sumi Wiring India Limited Company giving opportunity to earn Money From Shares on 14 November 2022.

हॅशटॅग्स

Money from Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x