3 May 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Investment Tips | सरकारी योजना म्हणजे बिनधास्त गुंतवणूक! ही योजना 4 वर्षांत देईल 1 कोटीचा फायदा, योजनेचे फायदे पाहाच

Investment Tips

Investment Tips | एलआयसी जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड योजना असून ती बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. ही योजना मर्यादित प्रीमियम मनी बॅक योजना आहे. या योजनेतील किमान मूळ विमा रक्कम 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची ही योजना उच्च उत्पन्न गटातील लोकांना विचारात घेऊन सुरू करण्यात आली होती. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला फक्त 4 वर्षांसाठी दरमहा 94,000 रुपये प्रिमियम जमा करावे लागेल. ही प्रिमियमची रक्कम तुम्ही वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा दरमहा पद्धतीने जमा करू शकता. एकदा जी का हा कार्यकाळ पूर्ण झाला तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर रिटर्न मिळायला सुरुवात होईल.

या योजनेंतर्गत, तुम्हाला पाच वर्षांसाठी दरमहा 50 हजार रुपये परतावा म्हणून दिला जाईल. आणि 6 व्या वर्षापासून पुढील कालावधीसाठी 55 हजार रुपये दरमहा दिले जातील. या जीवन विमा योजनेची एक खास गोष्ट म्हणजे ही योजना तुम्हाला सुरक्षितता आणि बचत दोन्ही सुविधा प्रदान करते. समजा पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदत पूर्ण होण्याआधी मृत्यू झाला तर ठेवीदारांच्या नॉमिनीला निश्चित परतावा रक्कम दिली जाईल. यासोबतच तुम्ही जीवन शिरोमणी विमा पॉलिसीवर अडचणीच्या काळात कर्जही घेऊ शकता. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला किमान एक वर्ष पॉलिसी प्रीमियम नियमित भरावा लागेल.

योजनेचा फायदा : LIC जीवन शिरोमणी विमा योजना या पॉलिसीच्या सर्व्हायव्हल बेनिफिटमध्ये विमा रकमेची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ,
* 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये : 10 व्या आणि 12 व्या वर्षी 30 टक्के विमा रक्कम दिली जाते.
* 16 वर्षांच्या पॉलिसीवर : 12 व्या आणि 14 व्या वर्षी 35 टक्के विमा रक्कम दिली जाते.
* 18 वर्षांच्या पॉलिसीवर : 14 व्या आणि 16 व्या वर्षी 40 टक्के विमा रक्कम दिली जाते.
* 20 वर्षांच्या पॉलिसीवर : 16व्या आणि 18व्या वर्षी 45 टक्के विमा रक्कम दिली जाते.

योजनेचे खास वैशिष्ट्ये :
18 ते 55 वर्षे या वयोगटातील लोक LIC जीवन शिरोमणी विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू शकतात. या विमा योजनेत चार पॉलिसी अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. 14 वर्षांपर्यंत पॉलिसी मुदतीसाठी कमाल वयोमर्यादा वय 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 16 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वयोमर्यादा 51 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वयोमर्यादा 48 वर्षे आणि 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या जीवन विमा पॉलिसीची एक खास गोष्ट अशी आहे की, यात कमाल विम्याच्या रक्कमेची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips on LIC Jeeavan Shiromani Vima Yojana Benefits and returns on investment on 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x