
SBI Mutual Fund | आज आपण या लेखात एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि सुरक्षित भविष्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने आपण आपल्या सर्व आवश्यक उद्दिष्टांची आणि जीवनावश्यक गरजांची सहज पूर्तता करू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरता असली की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत नाही. जर तुम्हालाही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध बनवायचे असेल तर तुम्ही SBI म्युचुअल फंडमध्ये नक्की गुंतवणूक केली पाहिजे.
SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ फंड – SBI Technology Opportunities Direct Growth Fund
SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युचुअल फंड योजनेत मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 24.49 टक्के परतावा मिळाला आहे. दुसरीकडे जर तुम्ही मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या म्युचुअल योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 24.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून बंपर परतावा कमवायचा असेल तर तुम्ही SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेत बिनधास्त गुंतवणूक करू शकता.
SIP गुंतवणूक :
SIP पद्धतीने एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. या म्युच्युअल फंड योजनेत तुम्ही दर महा 5,000 रुपये SIP पद्धतीने जमा करू शकता. आणि ही योजना दीर्घकाळात मॅच्युरिटीच्या वेळी 3.2 कोटी रुपयांचा परतावा कमावून देईल. एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करण्याचा फायदा असा की, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
भरघोस परतावा कमावण्याचा हिशोब :
एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला त्याचा एक निश्चित कालावधी ठरवावा लागेल. समजा तुम्ही गुंतवणुकीसाठी 40 वर्ष कालावधी निश्चित केला आहे. मग तुम्हाला या कालावधी साठी दरमहा 5000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. सहसा अनेक म्युचुअल फंड दीर्घकाळात 10-15 टक्के परतावा सहज देतात.
समजा तुम्हाला 10-15 टक्के सरासरी वार्षिक दराने परतावा मिळाला तर 40 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळ 3.2 कोटी रुपये परतावा सहज मिळेल. या गुंतवणुकीच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक रसकम 24 लाख रुपये असेल. आणि तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 2.9 कोटी रुपयेचा फायदा होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.