1 May 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Kaynes Technology IPO | कडक कमाई होणार! या आयपीओ'चा शेअर 200 रुपये प्रिमियमवर, स्टॉक वेगाने पैसा देणार, डिटेल जाणून घ्या

Kaynes Technology IPO

Kaynes Technology IPO| Kaynes Technology कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या IPO ने बाजारात एक नवीन ऊर्जा संचारीत केली आहे. Kaynes Technology कंपनीचा IPO 34.16 पट अधिग्रहण झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणारे लोक आता Kaynes Technology कंपनीचे शेअर्स वाटप होण्याची वाट पाहत आहेत. गुंतवणूकदारांना आता शेअर वाटपाच्या रेकॉर्ड तारीखचे वेध लागले आहे. Kaynes Technology कंपनीच्या शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 195-200 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

Kaynes Technology कंपनीच्या शेअरची स्टॉक मार्केटमध्ये मजबूत लिस्टिंग होण्याचे संकेत मिळत आहेत. Kaynes Technology कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 559-587 रुपये निश्चित करण्यात आली होती. जर या कंपनीच्या शेअर्सची किंमत ग्रे मार्केट मध्ये 200 रुपये प्रीमियम वर टिकुन राहिली, तर Kaynes टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 787 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. अशा स्थितीत , ज्यां गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी जबरदस्त प्रॉफिट होणार आहे. Kaynes टेक्नॉलॉजी कंपनीने 18 नोव्हेंबर 2022 रोजी IPO शेअर्सच्या वाटपाचे स्टेटस जाहीर केले आहे.

Kaynes Technology कंपनी मुख्यतः ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल, एरोस्पेस आणि डिफेन्स, आऊटर-स्पेस, न्यूक्लियर, मेडिकल, रेल्वे, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि या सेक्टरमध्ये उत्पादन आणि सेवा सुविधा प्रदान करते. Keynes Technologies कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 98.47 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उपलब्ध राखीव कोटा 21.21 पट अधिक सबस्क्राईब केला आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी उपलब्ध राखीव कोटा 4.1 पट अधिक सबस्क्राईब केला आहे. कॅन्स टेक्नॉलॉजी या कंपनीची ऑर्डर बुक अधिक वाढण्याची शक्यता आहे. बहुतेक ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. केन्स टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Kaynes Technology IPO is ready to Get Listed on Stock market soon 19 November 2022.

हॅशटॅग्स

#Kaynes Technology IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x