28 April 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ही योजना तुमचे पैसे दुप्पट करेल, गुंतवणुकीचा हिशोब पहा आणि पैसे वाढवा

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल गुंतवणुकदारांना पैसे लावून मजबूत परतावा कमावून देणारे अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. पण अजूनही लोक जुन्या गुंतवणुक योजनांमध्येच गुंतवणूक करतात. लोक आजही पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांना गुंतवणुकीत अधिक सुरक्षितता हवी आहे. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित गमवायची जोखीम घ्यायची नाही. पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये पैसा सुरक्षित राखण्याची हमी मिळते. या गुंतवणूक पर्यायांमध्ये बँक एफडीचा समावेश होतो. जसे तुम्ही बँकेत एफडी करता, तसाच एक गुंतवणूक पर्याय पोस्ट द्वारे देखील दिला जातो, मात्र त्याला टाईम डिपॉझिट असे म्हणतात. या दोन्ही योजनेत जास्त फरक नाही, फक्त नाव वेगवेगळे आहे. खरेतर दोन्ही गुंतवणूक पर्याय समान असून पोस्ट ऑफिस टीडी योजना तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मालामाल बनवू शकते. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.

गुंतवणुकीवर चक्रवाढीचा लाभ :
पोस्ट ऑफिसद्वारे जी एफडी योजना राबवली जाते, तिला टाइम डिपॉझिट योजना असे म्हणतात. गुंतवणूकदारांना या योजनेत ही इतर एफडी पर्यायांप्रमाणे चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. गुंतवणुक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा हा फक्त दीर्घकाळ गुंतवणुक केल्यावरच मिळतो. तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये दीर्घ कालावधीसाठी पैसे लावले तर संयम राखल्यास तुमचे पैसे या योजनेत सहज दुप्पट होऊ शकतात.

गुंतवणूकीचा कालावधी :
पोस्ट ऑफिस TD स्कीममध्ये तुम्ही एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीसाठी पैसे लावू शकता. कामाची बातमी अशी की तुम्ही या योजनेत गुंतवणूक कालावधी आणखी वाढवू शकता. उदाहरणार्थ, समजा जर तुम्ही 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफीसमधे TD योजनेत गुंतवणूक केली आणि योजना परिपक्व झाली की तुम्ही हा कलावधी आणखी वाढवू शकता. तुम्ही पोस्ट ऑफीस टीडी योजनेची मुदत तुम्हाला हव्या तेवढ्या अधिक कालावधीसाठी वाढवू शकता.

सध्या गुंतवणुकीवर व्याजदर :
सध्या गुंतवणुकदारांना पोस्ट ऑफिस TD योजनेत 5 वर्षांची गुंतवणूक केल्यास 6.7 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जातो. समजा तुम्ही 5 वर्षांसाठी TD योजनेत 8 लाख रुपये जमा केले तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार 5 वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11.15 लाख रुपये होईल. म्हणजेच तुमच्या TD मधील 8 लाख रुपयांवर तुम्हाला 3.15 लाख रुपये व्याज परतावा दिला जाईल. जर तुम्हाला 21 लाखांपेक्षा जास्त परतावा कमवायचा असेल तर तुम्हाला योजनेची मुदत आणखी 10 वर्षे वाढवावी लागेल.

15 वर्षात मिळणारा परतवा :
समजा तुम्ही तुमचा TD योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षे वाढवला तर तुम्हाला 8 लाख रुपये गुंतवणूकीवर 15.54 लाख परतावा मिळेल. यामध्ये तुम्हाला व्याज म्हणून 7.54 लाख रुपये परतावा दिला जाईल. म्हणजे या कालावधीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट होईल. त्याचप्रमाणे तुम्ही TD योजनेचा कालावधी आणखी 5 वर्षे वाढवला तर तुम्हाला 8 लाख रुपयेवर 21.67 लाख रुपये परतावा मिळेल. 15 वर्षांत तुम्हाला 8 लक्ष रुपये गुंतवणुकीवर 13.67 लाख रुपये व्याज परतावा दिला जाईल.

कालावधी नुसार व्याजदर :
वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनेत लोकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर दिले जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 5.50 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. दोन वर्षांसाठी TD योजनेत तुम्हाला 5.70 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. जेर तुमचा गुंतवणूक कालावधी 3 वर्षांसाठी असेल तर तुम्हाला 5.80 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. 5 वर्षांच्या मदतीवर तुम्हाला TD योजनेत 6.70 टक्के दराने व्याज परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office Time Deposit Scheme for investment and huge returns with amazing benefits on 21 November 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x