29 April 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
x

Shukra and Mangal Grah Rajyog | शुक्र-मंगळ ग्रहांमुळे 5 डिसेंबरपर्यंत राजयोग, या 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिक शुभं काळ

Shukra and Mangal Grah Rajyog

Shukra and Mangal Grah Rajyog | ज्योतिष शास्त्रानुसार, एकमेकांच्या राशीत दोन ग्रहांच्या संक्रमणाने राजयोग तयार होतो. जर दोन्ही ग्रहांची नजर एकमेकांवर असेल तर राजयोग आणखी प्रभावी मानला जातो. १३ नोव्हेंबर रोजी मंगळाने वृषभ राशीत प्रवेश केला आणि राजयोगाची निर्मिती केली. हा राजयोग ५ डिसेंबरपर्यंत लागू असेल. त्यानंतर शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. सध्या ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास मंगळ शुक्राच्या राशीत विराजमान असून शुक्र मंगळाच्या राशीत विराजमान झाला असून दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. शुक्र आणि मंगळापासून बनलेला राजयोग अनेक राशींसाठी शुभ ठरेल. जाणून घ्या तुमची राशी देखील भाग्यशाली आहे का.

वृषभ राशी –
वृषभ राशीच्या चढत्या घरात मंगळाचे भ्रमण होत असून सप्तमात शुक्र संचार करीत आहे. या काळात तुमची हिंमत आणि पराक्रम वाढेल. सुखसोयींमध्ये खर्च कराल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित करता येतील. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम आहे.

कर्क राशी –
शुक्र कर्क राशीच्या पंचमात आणि मंगळ अकराव्या घरात आहे. प्रियकर-प्रेयसीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. महिला व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. विशेषत: महिलांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये फायदा होईल.

धनु राशी –
मंगळ ग्रहाच्या षष्ठात आणि शुक्र बाराव्या घरात संचार करीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे दोन्ही ग्रह धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरतील. धनु राशीच्या लोकांना या वेळी भौतिक सुखसोयी मिळू शकतात. कोणतेही अडकलेले काम पूर्ण करता येते. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ आहे. नोकरीधंद्यातील इच्छुकांना शुभवार्ता मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shukra and Mangal Grah Rajyog effect these 3 zodiac signs check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Shukra and Mangal Grah Rajyog(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x