 
						PAN-Aadhaar Link | पॅनकार्ड आणि आधार कार्ड ही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची कागदपत्रे बनली आहेत. या दोन कागदपत्रांशिवाय तुम्ही तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण करू शकत नाही. पॅनकार्ड हा एक महत्त्वाचा आर्थिक दस्तावेज आहे. त्याचबरोबर आधार कार्डचा वापर बहुतांशी आयडी प्रूफ म्हणून केला जातो. हल्ली बँक खाते उघडण्यापासून ते गुंतवणूक, प्रॉपर्टी खरेदी, दागिने खरेदी अशा सर्व कामांसाठी आधार कार्डची गरज भासते. अशावेळी पॅनला आधारशी लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही मार्च 2023 पर्यंत पॅनशी आधार लिंक केलं नाही तर मार्च 2023 नंतर तुमच्या पॅन कार्डचा काहीही उपयोग होणार नाही. यानंतर नागरिकांना पॅन आणि आधार लिंक करण्याची सुविधा दिली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केल्याने पॅन आणि आधार लिंक करण्याची ही शेवटची संधी आहे.
यानंतर ही मुदत वाढवून देण्याबाबत कोणताही विचार केला जात नसल्याचं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. यासोबतच मार्च 2023 पर्यंत जर हे काम पूर्ण झालं नाही तर तुमचं पॅनकार्ड निरुपयोगी होईल असंही आयकर विभागानं म्हटलं आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही.
आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास भरावा लागणार दंड
आयकर विभागाने लोकांना 31 मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्यास सांगितले आहे, परंतु यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. 1 जुलै 2022 ते मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार लिंक केल्यास तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तरीही तुम्ही या दोघांना लिंक केलं नाही, तर हे पॅनकार्ड अवैध ठरेल किंवा रद्द होईल.
पॅन लिंक न केल्यास काय होईल
जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला आयटीआर फाइल करण्यात अडचणी येतील. यासोबतच तुम्हाला जुनं रिफंड आहे, तेही अडकतील. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. बँक खाते उघडण्याची परवानगी मिळणार नाही. यासोबतच तुम्हाला बँकेत पैसे जमा करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करताना अडचणी येतील.
पॅनला आधारशी कसे जोडावे
* त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या वेबसाइटला www.incometaxindiaefiling.gov.in भेट द्या.
* यानंतर तुम्ही लिंक आधार पर्यायावर क्लिक करा.
* यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि इतर अनेक डिटेल्स भरावे लागतील.
* यानंतर, दंड शुल्क आणखी भरा. क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही ते भरू शकता.
* पुढे तुम्हाला कॅप्चा कोड दिसेल जो तुम्ही भरता.
* यानंतर तुमचा आधार क्रमांक भरा.
* यानंतर तुमच्या आधार लिंक्ड नंबरवर ओटीपी येईल, जो टाकला जाईल.
* यानंतर तुम्हाला आधार आणि पॅनशी लिंक केलं जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		