
Post Office RD Vs SIP | दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच मोठा परतावा देते. वेगवेगळ्या जोखीम प्रकारानुसार आणि क्षमतेनुसार दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला डायरेक्ट जोखीम न घेता नियमितपणे गुंतवणूक करून चांगला परतावा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम हा गुंतवणूकीचा मजबूत पर्याय ठरू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजारातील जोखीम घेऊ इच्छीत असाल, तर म्युचुअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला एक निश्चित उत्पन्न मिळेल. पोस्ट ऑफीस RD स्कीममध्ये व्याजदर आधीच ठरलेले असतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मार्केट रिस्कचा सामना करावा लागत नाही. दुसरीकडे, म्युच्युअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, परंतु ही स्कीम खूप चांगला परतावा कमावून देते.
पोस्ट ऑफिस RD :
तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेमध्ये किमान 1,000 रुपये दर महिन्यांला जमा करून आपली गुंतवणूक सुरू करु शकता. या स्कीममध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 5.8 टक्के दराने व्याज परतावा मिळेल. या योजनेतील गुंतवणुकीवर व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने तिमाही आधारावर करतात.
समजा, तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये दरमहा 500 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, पाच वर्षांनंतर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 69694 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 60,000 रुपये असेल आणि तुम्हाला 9,694 रुपये व्याज परतावा दिला जाईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही RD स्कीम मध्ये मासिक 5,000 रुपये जमा केले तर 5 वर्षांत तुम्हाला 3,48,480 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 3 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला 48,480 रुपये व्याज परतावा मिळेल.
SIP मध्ये 1,000 मासिक गुंतवणूक :
जर तुम्ही थोडी मार्केट रिस्क घेऊन म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर दीर्घ काळात तुम्ही जबरदस्त परतावा कमवू शकता, हे नक्की. म्युच्युअल फंड योजनेमध्ये तुम्ही किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. दीर्घ मुदतीत बहुतेक म्युचुअल फंड SIP योजना लोकांना वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा कमावून देतात.
समजा, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने 1,000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली. जर या गुंतवणुकीवर तुम्हाला सरासरी वार्षिक 12 टक्के दराने परतावा मिळाला तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 82,486 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 60,000 रुपये असेल आणि तुम्हाला 22,486 रुपये व्याज परतावा मिळेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही एसआयपी मध्ये दरमहा 5,000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 4,12,432 रुपये परतावा मिळेल. यामध्ये रकमेत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 3 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला 1,12,432 रुपयांचा व्याज परतावा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.