2 May 2024 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग

China, Masood Azhar

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. परंतु, चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x