3 May 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश: भाजप

Bharatiya Janata Party, BJP, Pandit Nehru, Masood Azhar

नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आज चौथ्यांदा चीनने खोडा घातला. युनोमध्ये चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताने केलेली मोर्चेबांधणी अयशस्वी ठरली आहे.

त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असा टोला त्यांनी लगावला आहे. मसूद अझहरला दोषी न ठरवता येण्यासाठी अप्रत्यक्षपणे तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुच जबाबदार असल्याचे भाजपाने राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे.

मसदूर अझहरला दहशतवादी ठरवण्याचे भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टिका केली. ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही,’ असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी ‘गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेणे, दिल्लीत भटकणे आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकणे हीच मोदींची चीनबरोबरची कुटनिती आहे,’ असंही म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x