
Money From Share | नर्मदा जिलेटिन्स या जिलेटिन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची चलबिचल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नर्मदा जिलेटिन कंपनीचे शेअर जबरदस्त स्पीडमध्ये धावत सुटले आहेत. शेअर्समध्ये इतकी जबरदस्त तेजी येण्याचे कारण म्हणजे, नर्मदा जिलेटिन कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 100 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश जाहीर वाटप करण्याचे जाहीर केले आहेत. कंपनीने लाभांश जाहीर केल्यावर शेअर अप्पर सर्किट वर ट्रेड करत आहे. नर्मदा जिलेटिन कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 53 टक्के इतका जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.
7 दिवसात 80 टक्के परतावा :
नर्मदा जिलेटिन्स कंपनीच्या शेअर्सने मागील 7 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 237.95 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 9 नोव्हेंबर 2022 रोजी नर्मदा जिलेटिन कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 423.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नर्मदा जिलेटिन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 160 रुपये होती. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.
लाभांशाची रेकॉर्ड तारीख :
नर्मदा जिलेटिन्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, 7 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1000 टक्के म्हणजेच प्रति शेअर 100 रुपये विशेष अंतरिम लाभांश वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हा विशेष लाभांश 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जाहीर केला आहे. 19 डिसेंबर 2022 ही लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. लाभांश घोषित केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश अदा करेल.
जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत नर्मदा जिलेटिन कंपनीने 46.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 2.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 43.23 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यावेळी कंपनीने 2.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे बाजार भांडवल 257 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.