29 April 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

SIP Calculator | सुपर से उपर रिटर्न्स! दरमहा फक्त 2000 रुपये जमा करून मिळवा 70,59,828 रुपये परतावा, हिशोब समजून घ्या

Highlights:

  • SIP Calculator
  • SIP मध्ये 2000 मासिक गुंतवणूक
  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी उत्तम पर्याय
SIP Calculator

SIP Calculator | आजकाल बहुतेक लोक खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. त्यामुळे अशा लोकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा पर्याय नसतो. त्यामुळे लोक अशा गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावतात जिथून त्यांना चांगला परतावा कमावता येईल आणि वृद्धापकाळात पैशांची कमतरता भासणार नाही.

सध्या जर तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल, तर तुमच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना खूप फायद्याची ठरू शकते. तुम्ही एसआयपी योजनेत फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही एसआयपी मध्ये दरमहा 2000 रुपये जमा केल्यास काही वर्षांत 70 लाखांपेक्षा जास्त परतावा कमवू शकता. चला जाणून घेऊ सविस्तर.

SIP मध्ये 2000 मासिक गुंतवणूक :
समजा तुम्हाला वयाच्या 22 व्या वर्षी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली, आणि तुमचा मासिक पगार 15000 रुपये आहे. तर तुम्ही एसआयपी गुंतवणुकीसाठी मासिक पगारातून किमान 2000 रुपये सहज बचत करू शकता. जर तुम्ही वयाच्या 22 व्या वर्षापासून दरमहा 2000 रुपयेची एसआयपी गुंतवणूक सुरू केली, आणि पुढील 30 वर्षे सतत पैसे कम करत राहिल्यास 24000 रुपये तुमची वार्षिक गुंतवणूक जमा होईल. अशा प्रकारे 30 वर्षांत तुमची एकूण 7,20,000 प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल.

या दरम्यान एसआयपी गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळत राहील. एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, जर तुम्ही 30 वर्ष नियमित एसआयपी मध्ये गुंतवणुक करत राहिल्यास तुम्हाला 12-15 टक्के परतावा सहज मिळू शकतो. ज्या दराने परतावा मिळाल्यास तुम्हाला 63,39,828 रुपये व्याज परतावा मिळेल, आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला तुम्हाला 6339828+7,20,000 = 70, 59,828 रक्कम मिळेल.

जर समजा तुम्ही वयाच्या 22 व्या वर्षी म्युचुअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू केली, तर 30 वर्षांनंतर तुमचे वय 52 वर्षे असेल. म्हणजेच वयाच्या 52 व्या वर्षी तुमच्याकडे एसआयपी मधूनच 70 लाखापेक्षा मोठा फंड तयार झाला असेल. दुसरीकडे, जर तुम्ही दरमहा एसआयपी मधील गुंतवणुकीचे प्रमाण हळूहळू वाढवत राहिल्यास तुम्हाला करोडोमध्ये परतावा मिळू शकतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी उत्तम पर्याय :
दीर्घकालीन गुंतवणुक करण्यासाठी एसआयपी पेक्षा चांगला इतर गुंतवणूक पर्याय शोधून ही सापडणार नाही. एसआयपी मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो. तुम्ही जितक्या लवकर आणि जास्त काळ एसआयपी मध्ये गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळेल.

आतापर्यंत एसआयपीचा रेकॉर्ड आहे की, ही स्कीम लोकांना सरासरी वार्षिक 12-15 टक्के परतावा सहज कमावून देते. कधी कधी 15 टक्के किंवा त्याहून जास्त परतावा देखील मिळतो. असा जबरदस्त परतावा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार नाही.

एसआयपी’ची एक चांगली गोष्ट अशी की, थेट बाजारात पैसे गुंतवण्यापेक्षा एसआयपी मध्ये गुंतवल्यास जोखीम कमी होते. अशा जबरदस्त योजनेत तुम्ही नक्कीच गुंतवणूक करण्याची योजना आखली पाहिजे. कारण ही योजना तुम्हाला सहज करोडपती बनवू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator for mutual funds Scheme return check details on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x