4 May 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Penny Stock | करोडपती बनवणारा शेअर! 60,000 रुपयांवर 1 कोटी परतावा दिला, शेअर अजूनही तेजीत, नोट करा

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stock | एलजी बालकृष्णन अँड ब्रॉस लिमिटेड या कंपनीख्य शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त पटींनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 699 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा शेअर पुढील काळात 848 रुपयांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. जर हा स्टॉक नवीन लक्ष किंमत गाठण्यास यशस्वी झाला तर गुंतवणुकदारांना अल्पावधीत 22 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, L G Balakrishnan & Bros Share Price | L G Balakrishnan & Bros Stock Price | BSE 500250 | NSE LGBBROSLTD)

कंपनीबद्दल थोडक्यात :
LG बालकृष्णन अँड ब्रदर्स कंपनी मुख्यतः दुचाकी वाहनांसाठी ड्राइव्ह चेन पुरवणारी भारतातील सर्वात मोठी म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या मोठ्या ऑटो मोबाईल कंपन्यांना टायमिंग चेन देखील पुरवते. त्याचबरोबर कंपनीचा ग्राहक वर्ष अमेरिकेत ही विस्तारला आहे. कंपनी आपले उत्पादन अमेरिकेतही अनेक कंपन्यांना निर्यात करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,184.28 कोटी रुपये आहे.

20 वर्षात हजारो कोटींची गुंतवणूक :
28 मार्च 2002 रोजी एलजी बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 वर्षांनंतर आज सध्या हा स्टॉक 176 पट वाढीसह 695.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अजूनही या स्टॉकमध्ये अप ट्रेण्ड सुरू आहे. म्हणजेच जर जे तुम्ही 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 57,000 रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून एक कोटी रुपयां गेले असते.

अल्पावधीतही बंपर परतावा :
बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात नाही तर अल्पावधीत ही उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. या वर्षी 20 जून 2022 रोजी या कंपनीचा शेअर 508.90 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक पातळी किमतीवर ट्रेड करत होता. नंतर या स्टॉकमध्ये कमालीची खरेदी वाढली आणि 16 सप्टेंबर 2022 पर्यंत शेअर 805.15 रुपयांच्या विक्रमी किंमतीवर ट्रेड करत होता. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 58 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मात्र नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा झपाट्याने पडझड सुरू झाली होती, आणि शेअर सध्या 14 टक्के स्वस्त किमतीवर उपलब्ध झाला आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये अप ट्रेंड :
बालकृष्णन अँड ब्रदर्स लिमिटेड कंपनी ही चेन ट्रान्समिशन/ड्राइव्ह चेन आणि दुचाकी वाहनांसाठी स्प्रॉकेट्सचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या श्रेणीतील वस्तू उत्पादनात 75 टक्के वाटा आहे. त्याचवेळी कंपनी देशात आणि विदेशात आपला उद्योग विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. भारतात दुचाकी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबसने विश्वास व्यक्त केला आहे की, या कंपनीला ट्रान्समिशनमधून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये 24 टक्के CAGR दराने वाढू शकतो. ही अपेक्षीत वाढ लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्ससाठी 848 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म ने या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stock of L G Balakrishnan And brothers share price return on investment on 18 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x