28 April 2024 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Stocks Investment | मजबूत परतावा देणारे शेअर्स शोधत आहात?, म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे शेअर्स खरेदी केले, संधी सोडू नका, यादी सेव्ह करा

Stock Investment

Stock Investment | सप्टेंबर 2022 पासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. संपूर्ण महिनाभर बाजारात अक्षरशः गोंधळाचे वातावरण दिसून आले. दिग्गज आणि स्मॉल कॅप अशा सर्व स्टॉकमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळाली आहे. काही स्टॉकची किंमत कमालीची पडली असून ते सध्या अर्ध्या किमतीवर ट्रेड करत आहेत. निफ्टीमध्ये गेल्या महिन्यात 665 अंकांची म्हणजेच जवळपास 3.37 टक्क्यांची घसरण झाली होती. शेअर बाजारातील या अस्थिर आणि गोंधळाच्या परिस्थितीला आर्थिक मंदी, रशिया-युक्रेन युद्धाची वाढती व्याप्ती, आणि महागाई हे घटक जबाबदार आहेत. त्याच वेळी, FII/परकीय गुंतवणुकदारानी या कालावधीत 160 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक काढून घेतली, तर डिसेंबर 2020 नंतर ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक परकीय गुंतवणुक आली होती. DII ने सप्टेंबर 2022 मध्ये 170 दशलक्ष डॉलरची निव्वळ गुंतवणूक केली होती.

या पडझडीच्या काळात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवली होती. सप्टेंबर 2022 मध्ये म्युचुअल फंडमध्ये SIP द्वारे 12980 कोटींची गुंतवणूक झाली होती, जी मासिक आधारावर 2.2 टक्के आणि वार्षिक आधारावर 25.4 टक्के वाढकेली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता मासिक आधारावर 2.3 टक्क्यांवरून घसरून 38.4 लाख कोटी रुपयेवर आली आहे. या कालावधीत, लिक्विड, बॅलन्स आणि इक्विटी फंडांची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता कमी झाली असून इन्कम फंडांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, ग्राहक, आरोग्यसेवा, दूरसंचार, PSU बँका, किरकोळ आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांमध्ये म्युच्युअल फंडांचे वेटेज मासिक आधारावर सर्वाधिक राहिले आहे. तेल, तंत्रज्ञान, खाजगी बँका, धातू, उपयुक्तता, विमा आणि NBFC या सेक्टरमध्ये म्युचुअल फंडाचा वेटेज मध्यम आकाराचा राहिला आहे.

विविध क्षेत्रातील वेटेज :
ग्राहक वस्तू क्षेत्रातील वेटेज मासिक आधारावर 30 अंकांनी वाढले असून 7.1 टक्के या आपल्या 18 महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचले आहे. आरोग्य सेवा क्षेत्राचे वेटेज मासिक आधारावर 30 अंकांनी म्हणजेच जवळपास 6.6 टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तेल आणि वायूचे वेटेज मासिक आधारावर 50 अंकांनी घसरून 6 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. तंत्रज्ञानातही, वेटेज 20 अंकांनी कमी झाले असून 9.8 टक्के या आपल्या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.

म्युच्युअल फंडांनी मोठ्या प्रमाणत गुंतवणूक केलेल्या कंपन्यांची यादी :
* Airtel
* Sun Pharma,
* Adani Enterprises,
* Indian Hotels,
* Ambuja Cements,
* IndusInd Bank,
* Cipla pharmaceutical
* Bajaj Finance,
* Tube Investment,
* Solar Industries

म्युच्युअल फंडानी सर्वाधिक विक्री केलेल्या शेअर्सची यादी :
* रिलायन्स इंडस्ट्रीज,
* आयसीआयसीआय बँक,
* एचडीएफसी बँक,
* इन्फोसिस,
* टाटा मोटर्स,
* एचडीएफसी,
* टीसीएस,
* टाटा स्टील,
* एल अँड टी,
* कोल इंडिया

म्युच्युअल फंडानी गुंतवणूक वाढवलेले मिडकॅप स्टॉक्सची यादी :
* Syngene International,
* BHEL,
* CG Power & Industrial Solutions,
* Devyani International,
* Sun TV Network,
* Hatsun Agro Products,
* Punjab National Bank
* Canara Bank,
* Abbott India,
* LIC Houseing Finance

म्युचुअल फंडानी विकलेल्या मिडकॅप्स स्टॉकची यादी :
* व्होडाफोन आयडिया,
* बँक ऑफ इंडिया,
* एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस,
* गुजरात फ्लोरोकेमिकल्स,
* मदरसन सुमी वायरिंग इंडिया,
* अशोक लेलँड,
* आदित्य बिर्ला कॅपिटल,
* SAIL
* ICICI सिक्युरिटीज,
* वरुण बेव्हरेजेस

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Stock in which Mutual funds has increased Investment for huge returns on 14 October 2022

हॅशटॅग्स

#Stock Investment(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x