27 April 2024 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Mutual Funds | खरं की काय? होय! म्युच्युअल फंडाचा हा फॉर्म्युला नोट करा, छोटी रक्कम करोड मध्ये परतावा देईल, नशीब बदलेल

Mutual Fund

Mutual Funds | म्युच्युअल फंड हा गुंतवणुक पर्याय लोकांकडून अधिक पसंत केला जात आहे. लोकांनी आता म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली असून, दर तिमाही म्युचुअल मध्ये गुंतवणूक प्रमाण वाढत चालले आहे. लोकांनी आपल्या पगारातील काही भाग बचत करून म्युचुअल फंड मध्ये गुंतवायला सुरुवात केली आहे. या गुंतवणुकी मागील उद्देश्य जास्तीत जास्त परतावा कमावणे हा असतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू इच्छित असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला एक नियम सांगणार आहोत, जो गुंतवणूक करताना तुम्हाला अधिक फायदा मिळवून देईल. या फॉर्मुला नुसार तुम्ही पैसे जमा केल्यास तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या फॉर्म्युलाबद्दल सविस्तर

गुंतवणूकीचा फॉर्म्युला :
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर नियम आहे. 15×15×15 या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर दीर्घ काळात तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा मिळू शकतो. 15X15X15 या नियमानुसार सर्वप्रथम 15 टक्के दराने मिळणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही 15 वर्ष कालावधीसाठी नियमित 15000 रुपये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात करोडो चा परतावा मिळू शकतो.

15×15×15 चा नियम समजून घ्या :
15×15×15 हा फॉर्म्युला रिटर्न टार्गेट, गुंतवणुकीचा कालावधी आणि मासिक गुंतवणुकीची रक्कम दर्शवतो. म्युचुअल फंड नियमानुसार गुंतवणूक करताना सर्वप्रथम 15 टक्के परताव्याचे लक्ष्य निश्चित करा, आणि दरमहा 15 वर्षे कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक करा. नियमानुसार जर तुम्ही दरमहा 15000 रुपये 15 वर्ष कालावधीसाठी 15 टक्के सरासरी परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक केली तर तुमची 15 वर्षात 27 लाख रुपये ही प्रत्यक्ष गुंतवणूक जमा होईल. वार्षिक 15 टक्के दराने, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 कोटी रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे 15×15×15 फॉर्म्युला नुसार तुम्ही करोडपती होऊ शकता.

15 टक्के वार्षिक परतावा मिळतो? :
म्युचुअल फंड गुंतवणुकीत तुम्हाला 15 टक्के वार्षिक परतावा मिळेल हे सांगणे कठीण आहे, मात्र दीर्घकालीन गुंतवणुक करून तुम्हाला 12 टक्के परतावा सहज मिळू शकतो 15 टक्क्यांपर्यंत परतावा हवा असेल तर म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीची रक्कम वाढवा. दर वर्षी आपली गुंतवणूकीची रक्कम काही टक्क्यांनी वाढवत राहा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जास्त परतावा कमावता येईल. महागाई वाढीचा दर लक्षात ठेऊन तुम्ही SIP मध्ये वार्षिक गुंतवणूक रक्कम वाढवू शकता.

SIP चा हा सर्वात मोठा फायदा :
म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणुक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात दीर्घ काळात चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो. म्हणजेच तुम्ही यामध्ये जितका जास्त काळ नियमित गुंतवणूक करत राहाल तितका जास्त फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. अशा प्रकारे, योजनेच्या परिपक्वतेच्या वेळी तुम्ही करोडपती झालेला असाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP investment for earning huge returns in long term with a investment formula on 13 December 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x