
Sarkari Bank Shares | मागील काही महिन्यांपासून सरकारी बँकांचे शेअर्स कमालीचे प्रदर्शन करत आहेत. वाढत्या रेपो दराने सरकारी बँकाच्या शेअरमधील वाढीला हातभार लावला आहे. यामुळेच सरकारी बँकांचे शेअर्स दररोज आपले जून उच्चांकाचे विक्रम मोडित काढत आहेत. मागील एका महिन्यात शेअर बाजारात एकुण 22 ट्रेडिंग सेशन झाले. या दरम्यान UCO बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्सची किंमत 145 टक्क्यांनी वधारली आहे. या कालावधीत निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये 23 टक्क्यांची आणि निफ्टी-50 मध्ये एक टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स मागील काही काळापासून कामालीची कामगिरी करत आहेत, आणि त्यांनी आपल्या शेअरधारकांना अप्रतिम परतावाही कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या वाढी बाबत स्टॉक मार्केट तज्ञ काय विचार करतात.
या दोन बँकाच्या शेअर मध्ये कमालीची वाढ :
NSE निरर्देशांकावर ट्रेड करणाऱ्या UCO बँकेच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांची मजबुत वाढ नोंदवली आणि शेअर 36.55 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल कि या काळात UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 151 टक्क्यांचा जबरदस्त्त परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे पंजाब सिंध बँकेचे शेअर काल 4 टक्क्यांच्या वाढीसह 44.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज पंजाब अँड सिंध बॅकेचे शेअर्स 40.50 रूपये किमतीसह लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या दिर्घ कालीन गुंतवणूकदारांना 147 टक्केपेक्षा अधिक परतावा कामावून दिला आहे. या दोन बँकाशिवाय इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँकेच्या शेअरनी आपल्या शेअरधारकांना एका महिन्यात 82 टक्कयांची भरघोस कमाई करून दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने 57 टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 49 टक्के, पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने 41 टक्के आणि बँक ऑफ इंडियाच्या शेअरने 38 टक्के परवाता.
PSU बँकांचे शेअर वाढीचे कारण :
सरकारी PSU बँकांच्या शेअरमधील वाढीबाबात तज्ञानी आपले मत व्यक्त केले आहे की,” पीएसयू बँकांच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे प्रमूख कारण म्हणजे या बँकाच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहायला मिळाली आहे. बँकाच्या आरओए म्हणजेच मालमत्तेवर मिळणाऱ्या परताव्यात वाढ झाली आहे. सरकारी बँकेच्या शेअरमध्ये ही तेजी पुढील काही काळ पाहायला मिळू शकते. त्याच वेळी व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञाना असे वाटते की,” बहुतेक सरकारी बँकांनी मागील काही वर्षांत आपल्या शेअरधारकांना लाभांश वाटप केलेला नाही. पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांना या सरकारी बँकाकडून लाभांश वाटप केला जाईल अशी अपेक्षा आहे. PSU बँकांकडून लाभांशाची अपेक्षा आहे. याशिवाय बँकाचे ताळेबंद मजबूत दिसत असून पुढील काही काळ या शेअरमधील वाढ अशीच कायम राहील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.