 
						Super Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स आहेत, ज्यानी 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना बंपर मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये पैसे लावले, ते अल्पावधीत श्रीमंत झाले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन, अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज, रीजेंसी सिरॅमिक्स, डीप डायमंड इंडिया, क्वांटम डिजिटल व्हिजन कंपनीच्या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकने किती परतावा दिला याची पूर्ण माहिती.
अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज :
अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत 1089 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2228 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 7300 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज म्हणजेच सोमवार, 20 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 0.71 टक्क्यांच्या घसरणीसह 500 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 293.25 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 843 रुपये आहे. तर शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 22 रुपये होती. ही कंपनी अनेक व्यवसाय क्षेत्रात काम करते.
बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन :
बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 3 महिन्यांत 164 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे, मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत 4508 टक्क्यांनी वधारली आहे. तथापि सोमवार दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची कमजोरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक 311.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे मार्केट कॅप 752.29 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 501 रुपये आहे. तर या शेअरची 52-आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 4.42 रुपये होती. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन ही एक स्मॉल कॅप कंपनी असून सल्फ्यूरिक ऍसिड, कार्बन-डी-सल्फाइड, निर्जल सोडियम सल्फेट या रसायनाच्या उत्पादन व्यापारात गुंतलेली आहे.
रीजेंसी सिरॅमिक्स :
मागील 6 महिन्यांत रिजन्सी सिरॅमिक्स कंपनीच्या शेअर ने आपल्या शेअर धारकांना 1143 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, मागील एक वर्षात या स्टॉकने लोकांना 1176 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. आज म्हणजेच 20 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 25.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 46 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पत्की 2 रुपये होती. या कंपनीचे मार्केट कॅप 67.29 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः बांधकाम साहित्य निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करत आहे.
डीप डायमंड इंडिया :
डीप डायमंड इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 473 टक्क्यांनी वधारली आहे. दुसरीकडे मागील 1 वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 632 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. आज म्हणजेच 20 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 113.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 171 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 11 रुपये होती. या कंपनीचे मार्केट कॅप 33 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थपना 1995 साली झाली होती, आणि कंपनी तेव्हापासून जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करत आहे.
क्वांटम डिजिटल व्हिजन लिमिटेड :
क्वांटम डिजिटल व्हिजन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 681 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 594 रुपयेवर गेली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 34.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप 10 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 42 रुपये आहे. तर 52 आठवड्याची नीचांक किंमत 3 रुपये होती. ही स्मॉल कॅप कंपनी मुख्यतः पॅकेजिंग क्षेत्रात आपला व्यवसाय करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		