
Bank FD Vs Shares | परकीय गुंतवणूकदारांच्या वाढत्या खरेदीमुळे, निफ्टी इंडेक्समध्ये 2022 या वर्षात 4 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जुलै 2022 पासून परकीय गुंतवणुकदार आणि हेज फंड भारतीय इक्विटी मार्केटमध्ये पैसे ओतत आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी मागील काही आठवड्यात 84,000 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारात केली आहे. दरम्यान ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने विश्वास व्यक्त केला आहे की, भारतीय शेअर बाजाराच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून येणारा गुंतवणूक प्रवाह वाढत राहील. दरम्यान, ICICI Direct ने 2023 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी 6 जबरदस्त स्टॉक्सची निवड केली आहे. हे स्टॉक पुढील वर्षात जबरदस्त परतावा देऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारत फोर्ज :
भारत फोर्ज कंपनीच्या शेअर्ससाठी 875 ते 900 रुपये ही योग्य खरेदी किंमत राहील. तज्ञांनी या स्टॉकसाठी 1,150 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 1330 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉप लॉस म्हणजे, स्टॉकमध्ये पडझड सुरू झाली की, तो एका ठराविक किमतीवर आल्यास तुमचा स्टॉक आपोआप विक्रीसाठी ट्रिगर होईल. भारत फोर्ज कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 26.23 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज :
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तज्ञांनी 1610 ते 1655 रुपये खरेदी किंमत निश्चित केली आहे. या स्टॉकवर तज्ञांनी 2150 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच पुढील काळात हा स्टॉक 30 टक्क्यांनी वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकसाठी 1330 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. 2022 या वर्षात MCX कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 1.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
हिंदाल्को इंडस्ट्रीज :
हिंदाल्को इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तज्ञांनी 455 ते 470 रुपये खरेदी किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक स्टॉक मार्केट एक्स्पर्ट 590 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. म्हणजेच पुढील काळात हा स्टॉक 28 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 380 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. Hindalco च्या स्टॉकने 2022 मध्ये या वर्षात आपल्या शेअर धारकांच्या 4.37 टक्के नुकसान केले आहे.
LTI Mindtree :
LTI Mindtree कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 4350 ते 4450 रुपये खरेदी किंमत जाहीर केली आहे. तज्ञांना विश्वास आहे की, या स्टॉक पुढील कलग्ल 5800 रुपये लक्ष्य किंमत स्पर्श करेल. म्हणजेच हा स्टॉक 33 टक्क्यांचा परतावा देण्याची क्षमता राखतो. तज्ञांनी या स्टॉकवर 3620 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. 2022 मध्ये कंपनीच्या या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 42.08 टक्के नुकसान केले आहे.
सन फार्मा :
सन फार्मा कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 970 ते 1000 रुपये खरेदी किंमत निश्चित केली आहे. या शेअर साठी 1260 रुपये ही लक्ष किंमत दिली असून तज्ञांना विश्वास आहे की, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा मिळवून देईल. तुम्ही या शेअरवर 830 रुपयेचा स्टॉप लॉस लावून शेअर खरेदी करू शकता. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 16.71 टक्के परतावा कमावून दिला आहे.
एसबीआय बँक :
एसबीआय बँकेचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तज्ञांनी 610 ते 625 रुपये खरेदी किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक पुढील काळात 790 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात स्टॉक 31 टक्क्यांचा परतावा देऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकसाठी 515 रुपये स्टॉप लॉस लावण्याची शिफारस केली आहे. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना स्टॉकचा 28.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणुक करताना नेहमी कंपनीबद्दल संपूर्ण संशोधन करूनच पैसे लावावे. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील चढ-उतारांची काळजी करू नका.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.