29 April 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Investment Plan | तुमच्यासाठी भन्नाट गुंतवणूक योजना, फक्त 70 रुपये गुंतवून मिळवा 10 लाखांपेक्षा अधिक परतावा, योजना समजून घ्या

LIC Jeevan labh policy

Investment plan| भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ जिला आपण LIC म्हणूनही ओळखतो. या स्टॉकवर अनेक लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. LIC मध्ये लोक विश्वासाने गुंतवणूक करतात, कारण त्यांना आपल्या LIC मध्ये सुरक्षित वाटतात. तसेच LIC आपल्या गुंतवणूकदारांना नेहमी भरघोस परतावा देण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही कोणत्याही एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही लेखात तुम्हाला LIC च्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ह्या योजनेचे नाव आहे, “एलआयसी जीवन लाभ पॉलिसी”. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 70 रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा कमवू शकता.

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी :
LIC ची जीवन लाभ पॉलिसी ही नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच ही योजना शेअर बाजारावर कोणत्याही प्रकारे अवलंबून नाही. ह्या योजनेत तीन कालमर्यादा उपलब्ध आहेत. 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्षांसाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेला LIC ने अधिक सुरळीत बनवण्यासाठी लोकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा योजनेत कालावधी निवडून गुंतवणूक सुरू करू शकता.

गुंतवणुकीची वयोमर्यादा :
LIC नेहमी आपल्या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी एक समायोजित योजना प्लॅन तयार करते. ह्या योजनेत देखील LIC ने अल्पवयीन मुलांना गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. अल्पवयीन व्यक्ती देखील या पॉलिसीमध्ये पैसे जमा करून गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत गुंतवणुकीसाठी लागणारी किमान वयोमर्यादा 8 वर्षापासून सुरू होते. त्याच वेळी, गुंतवणुकीची कमाल वयोमर्यादा 59 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

जर एखाद्या व्यक्तीला ही योजना पुढील 21 वर्षांसाठी घ्यायची असेल, तर त्याचे वय 59 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ह्या योजनेत 25 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 50 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू शकता. कारण त्याची मॅच्युरिटीची कमाल मर्यादा 75 वर्ष असेल. नियमानुसार तुम्हाला 16,21,25 वर्षाचा मुदत कालावधी देण्यात आला आहे. तुम्हाला ह्यातूनच एक निवडावा लागेल. विमा रक्कमेची किमान गुंतवणूक मर्यादा 2 लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे, तर या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

10 लाखांपेक्षा अधिक परतावा :
LIC ने या योजनेत एक गंमत केली आहे, ती अशी की ही समजा तुम्ही पॉलिसीची मुदत 25 वर्षे घेतली असेल तर तुम्हाला पूर्ण 25 वर्ष प्रीमियम भरण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 16 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये दररोज फक्त 70 रुपये जमा केले तर पुढील 16 वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक रक्कम 4,12000 रुपये असेल. पण LIC तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा 25 वर्षानंतर देईल. 25 वर्षाच्या मॅच्युरिटीवर LIC तुम्हाला 14,41000 रुपयेचा परतावा देईल. जर तुम्हाला या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला काही कागदपत्र जमा करावे लागतील, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, आयकर रिटर्न, वयाचा पुरावा, योजनेचा फॉर्म आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी अहवाल तुम्हाला जमा करावे लागू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment plan of LIC Jevvan Labh Policy benefit on 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x