
ITR PAN-Aadhaar Link | सरकारने ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या तारखेपर्यंत लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्याचबरोबर त्याशिवाय तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नवर प्रक्रिया करू शकणार नाही. तसेच 50 हजार रुपयांच्या वर बँकिंग व्यवहार करणे आवश्यक आहे. असं ट्विट आयकर विभागाने नुकतंच केलं आहे. अनेक लोकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. मात्र आता पॅन कार्डशी आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आपण घरी बसून ते ऑनलाइन लिंक करू शकता. येथे आम्ही तुम्हाला पॅनला आधारशी जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगत आहोत.
पॅन कार्डला आधारशी ऑनलाईन लिंक कसे करावे – PAN-Aadhaar Linking
ऑनलाईन पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर वेबसाईटच्या लिंक आधार पर्यायावर क्लिक करून लॉग-इन करावं लागेल. येथे पॅन नंबर आणि युजर आयडीसह आधार कार्डनुसार आपले नाव आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय निवडा. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर तुम्हाला खाली ‘लिंक आधार’चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावं लागेल. अशात तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल.
आता तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी आयकर विभागाने पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1 जुलै 2022 पर्यंतची डेडलाईन दिली होती. आता पॅनला आधारशी जोडल्याबद्दल तुम्हाला 1000 रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
या लोकांना सूट देण्यात आली आहे
पॅनशी आधार लिंक करणं प्रत्येकासाठी बंधनकारक आहे, मात्र काही लोकांना यातून सूट देण्यात आली आहे. खरंतर आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅनला आधारशी लिंक करण्यात काही लोकांना दिलासा देण्यात आला आहे. यात आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयातील लोक, अनिवासी भारतीय आणि ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक आणि परदेशी नागरिक इत्यादींचा समावेश आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.