29 March 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील कोसळलेले नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्हीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 59,010 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला आहे. (What is the price of 22 Carat Gold in Mumbai Today?)

सोन्याच्या दरात घसरण
आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांच्या घसरणीसह 59010 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोने 650 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे. सोने सध्या आपल्या उच्चांकी पातळीवरून सुमारे 476 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. सोन्याने 20 मार्च 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ५९४७९ रुपयांवर गेले होते.

चांदीही स्वस्त झाली आहे
याशिवाय चांदीचा भाव आज 0.31 टक्क्यांनी घसरून 70192 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात १२०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर येथेही भाववाढ दिसून येत आहे.

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४७१० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६९० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४७४० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७२० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४७१० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६९० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54740 रुपये, 24 कॅरेट सोने : 59720 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54710 रुपये, 24 कॅरेट सोने : 59690 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४७१० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६९० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४७४० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७२० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54710 रुपये, 24 कॅरेट सोने : 59690 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54710 रुपये, 24 कॅरेट सोने : 59690 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५४७४० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७२० रुपये

खरेदी करण्यापूर्वी हे तपासा
जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x