
Sah Polymers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पॉलिमर उत्पादक कंपनी साह पॉलिमर्सने आपला IPO जाहीर केला आहे. कंपनी शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करेल. या IPO मध्ये गुंतवणूकदार 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. रिपोर्टनुसार साह पोलिमर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 ते 65 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार या IPO स्टॉकमध्ये गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 पासून गुंतवणूक करू शकतात. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
सत इंडस्ट्रीजकडे 91.79 टक्के भाग भांडवल :
साह पॉलिमर्स कंपनी या IPO मध्ये 1,02,00,000 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करेल. या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल जाहीर केला नाही. सत इंडस्ट्रीजने साह पॉलिमर कंपनीचे 91.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. साह पॉलिमर्स कंपनी या IPO मध्ये 1,02,00,000 फ्रेश इक्विटी शेअर्स विकून भांडवल उभारणी करणार आहे.
IPO लिस्टिंग बद्दल :
Link Intime India Pvt Ltd कंपनीला या IPO साठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीचे इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधील BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. साह पॉलिमर कंपनीचा IPO 12 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजार सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.