
Rama Steel Tubes Share Price | रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या मेटल कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची योजना आखली आहे. 2023 या नवीन वर्षात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करेल. या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रत्येक शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.88 टक्के घसरणीसह 166.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)
बोनसची रेकॉर्ड डेट :
रामा स्टील ट्यूब्स कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने 18 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या बैठकीत एका शेअरवर 4 बोनस इक्विटी बोनस शेअर वाटप करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 6 जानेवारी 2023 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.
गुंतवणुकीवर मल्टीबॅगर रिटर्न :
रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 140.13 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यादरम्यानच्या काळात हा शेअर 71 रुपये किमतीवरून 171 रुपयांपर्यंत वाढला आहे. एका वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी 174.26 टक्के परतावा कमावला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10.07 टक्के मजबूत झाले आहेत.
रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी असून ती हार्ड PVC आणि G.I चे उत्पादन करते. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन करणारी भारतातील टॉप कंपन्यापैकी एक मानली जाते. ही कंपनी युनायटेड किंगडम, UAE, श्रीलंका, इथिओपिया, केनिया, युगांडा, घाना, कुवेत, रिपब्लिक ऑफ काँगो, येमेन, गयाना, जर्मनी, यूएसए, दक्षिण आफ्रिका, झांबिया आणि माल्टा यांसारख्या देशांमध्ये आपल्या ग्राहकांना उत्पादने निर्यात करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.