12 December 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Zen Technologies Share Price | 3 वर्षात 2500% परतावा देणारा झेन टेक्नॉलॉजीज शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, रोज 8-10% परतावा

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी लष्करी प्रशिक्षण आणि अँटी-ड्रोन सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते आणि स्टॉक 674.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 6.40 टक्के वाढीसह 718.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक आलेली तेजी एका मोठ्या ऑर्डरमुळे पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 175.50 रुपये होती. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 202 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहिती नुसार आता कंपनीच्या ऑर्डर बुकके एकूण मूल्य 1000 कोटी रुपयेवर पोहचले आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 202 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. यापूर्वी जुलै 2023 मध्ये देखील कंपनीला 500 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.

झेन टेक्नॉलॉजी कंपनीने एप्रिल-जून 2023 या तिमाहीत मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. एका तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 6 पट वाढ झाली आहे. Zen Technologies कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 47.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती निकालात दिली आहे.

मागील वर्षी याच तिमाही कालावधीत झेन टेक्नॉलॉजीज कंपनीने 8.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण सेल्स 4 पट वाढून 132.45 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी जून कालावधीत कंपनीने 33.23 कोटी रुपयेची सेल्स नोंदवली होती.

झेन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 3 वर्षात 2500 टक्के वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी Zen Technologies कंपनीचे शेअर 25.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 674.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या तीन वर्षाच्या कालावधीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2567 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तब्बल 261 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x