
Raj Rayon Industries Share Price | पेनी स्टॉक कधीकधी लोकांना कमी वेळात प्रचंड नफा मिळवून देतो. वर्षभर गुंतवणुकीची रक्कम अनेक पटींनी वाढते. अनेक वेळा गुंतवलेली संपूर्ण रक्कमही वाया जाते. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे राज रेयॉनच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा कमावला आहे. फक्त ०.३७ पैशाच्या या शेअरने तब्बल १३९६७ टक्के परतावा दिला आहे. मागील काही महिन्यापासून शेअर गुंतवणूकदारांचे खिसे भरत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने 8920 टक्क्यांची उसळी घेतली असून त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी ( ३० डिसेंबर २०२२) देखील राज रेयॉनचे शेअर्स 1.97% वाढून 36.20 रुपयांवर स्थिरावले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Raj Rayon Industries Share Price | Raj Rayon Industries Stock Price | BSE 530699 | NSE RAJRILTD)
दोन लाखांचे तब्बल दोन कोटी झाले :
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 27 ऑक्टोबर 2017 रोजी राज रेयॉन यांच्या शेअर्सची किंमत फक्त 25 पैसे होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी २५ पैसे दराने २ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची रक्कम आज १ कोटी ८० लाख रुपयांपर्यंत वाढली असती. या शेअरची उच्चांकी किंमत 57.40 रुपये होती. शुक्रवारी (३० डिसेंबर २०२२) या शेअर 36.20 रुपयांवर होती.
शेअरमध्ये तेजी
शुक्रवारी ( ३० डिसेंबर २०२२) राज रेयॉनच्या शेअरमध्ये वाढ होताना दिसली होती. कंपनीचा शेअर 1.97 टक्क्यांनी वधारून 36.20 वर ट्रेड करत होते. शेअरचा आजपर्यंतचा उच्चांक 57.4 रुपये आहे, तर निच्चांकी दर 1.29 रुपये राहिला आहे.
तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्याची सखोल चौकशी करा. कंपनीचा व्यवसाय त्याच्या मागील वर्षीच्या निव्वळ नफा आणि महसुलापर्यंत तपासा. याशिवाय कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन आणि कामगिरीची माहिती मिळाल्यानंतरच गुंतवणूक करा. शेअर खरेदी करण्यापूर्वी बाजार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पेनी स्टॉक्समध्ये तेवढीच गुंतवणूक करा जेवढी तुमची तोटा सहन करण्याची क्षमता आहे. अशा शेअर्समध्ये जास्त काळ गुंतवणूक करू नका. चांगला परतावा मिळताच शेअर विकून प्रॉफिट बुक करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.