28 April 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Orient Cement Share Price | गौतम अदानी ही सिमेंट कंपनी खरेदी करणार? शेअरने 2 दिवसात 21% परतावा दिला, कंपनीने दिली माहिती

Orient Cement Share Price

Orient Cement Share Price | जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीचे मालक आहेत. गौतम अदानी ज्या कंपनीवर बोट ठेवतात तिला सोना बनवून टाकतात. नुकताच अदानी ओरिएंट सिमेंट कंपनीतील प्रवर्तकांचे शेअर्स खरेदी करणार असल्याची बातमी आली, आणि ओरिएंट सिमेंट कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी वधारले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Orient Cement Share Price | Orient Cement Stock Price | BSE 535754 | NSE ORIENTCEM)

कंपनीत दिग्गज लोकांची भागीदारी :
30 सप्टेंबर 2022 पर्यंत या कंपनीत प्रवर्तकांचे भाग भांडवल प्रमाण 37.90 टक्के होते. तर म्युच्युअल फंड आणि विमा कंपनीकडे या कंपनीचे 11.30 टक्के भाग भांडवल आहे. त्याचवेळी कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांचा वाटा 6.43 टक्के आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचा 22.24 टक्के भाग भांडवल हिस्सा होल्ड केला आहे. कंपनी मध्ये अनेक दिग्गज गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. त्यात हरिमोहन बांगर यांनी 1.59 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. तर राकेश झुनझुनवाला यांनी 1.22 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. 2022 हा वर्ष या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगला नव्हता. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांची पडझड झाली होती. ओरिएंट सिमेंट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184 रुपये होती.

बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी ओरिएंट सिमेंट कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 12 टक्क्याच्या वाढीसह 148.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.83 टक्के वाढीसह 139.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीने अदानी समूहासोबत स्टॉक खरेदीबाबतच्या कोणत्याही चर्चेला नकार दिला आहे. तेव्हापासून पुन्हा कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत आहे. सध्या हा स्टॉक 139.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 ओरिएंट कंपनीने ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली. कंपनीने अदानी सोबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Orient Cement Share Price 535754 ORIENTCEM in Focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x