19 May 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Tax Saving Documents Proof | इन्कम टॅक्स वाचवायचा आहे? कंपनीला देण्यासाठी 'ही' गुंतवणूक पुराव्याची कागदपत्रं तयार ठेवा

Tax Saving Documents Proof

Tax Saving Documents Proof | २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षासाठी कंपन्यांनी कर जाहीरातीअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांकडून कर वाचविण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांची मागणी सुरू केली आहे. त्यामुळे गुंतवणूक करून ज्या कागदपत्रांमध्ये तुम्ही करबचतीची योजना आखली आहे, ती कागदपत्रे सादर करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही ज्या खर्चातून कर वाचवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्याशी संबंधित कागदपत्रे गोळा करा. या कागदपत्रांच्या आधारे तुमच्यावर करदायित्व निश्चित केले जाते किंवा तुम्हाला करसवलतीचा लाभ मिळतो. टॅक्स वाचविण्यासाठी आपल्या कार्यालयात सादर करावी लागणारी कागदपत्रे पाहूया.

या गुंतवणूकीशी संबंधित कागदपत्रे
आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’अंतर्गत करदाते १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरील कर वाचवू शकतात. युलिप, आयुर्विमा योजना, म्युच्युअल फंडांच्या करबचत योजना ईएलएसएस, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, ५ वर्षांची करबचत बचत योजना, ईपीएफ, एनपीएस या योजनांमध्ये ही गुंतवणूक करता येईल. याशिवाय दोन मुलांचे शैक्षणिक शुल्क आणि ८०सी अंतर्गत गृहकर्जाच्या मूळ रकमेवरही करसवलत मिळू शकते.

यापैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमची विमा कंपनी, म्युच्युअल फंड कंपनीकडून वार्षिक गुंतवणूक विवरण पत्र मागा. शिक्षण शुल्क किंवा गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या माध्यमातून करसवलत मिळवायची असेल, तर या गुंतवणुकीशी किंवा खर्चाशी संबंधित कागदपत्रे तातडीने जमा करा, कारण ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या कार्यालयात जमा करावी लागतात.

गृहकर्जाच्या व्याजावरील करसवलत
गृहकर्जावरील २ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाच्या रकमेवर तुम्हाला करसवलत मिळू शकते. म्हणजेच तुम्ही उत्पन्नातून 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची रक्कम वजा करू शकता. पण हा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही घोषणापत्रात जाहीर कराल आणि कागदपत्रे सादर कराल. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल आणि त्याच्या व्याजाच्या रकमेवर करसवलत मिळवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या बँकेकडून किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून स्टेटमेंट घ्यावे लागेल, ज्यामध्ये असे लिहिले आहे की तुम्ही या आर्थिक वर्षात मुद्दल रकमेच्या स्वरूपात भरले आहे आणि किती रक्कम व्याज म्हणून भरली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक व्याजाच्या रकमेवर करसवलत मिळू शकते. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज जरी दिले तरी 2 लाख रुपयांपर्यंतच्या वजावटीचा फायदा तुम्हाला मिळणार आहे.

HRA दाव्यासाठी पॅन कार्ड आवश्यक
एचआरए म्हणजे घरभाडे भत्ता. पगारात एचआरएच्या स्वरूपात मिळणाऱ्या रकमेवर करसवलत मिळवायची असेल, तर कंपनीकडे भाडे कराराच्या कागदपत्रांवर भाडेपावती सादर करावी लागते. जर तुमचं वार्षिक भाडं 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला घरमालकाचा पॅन नंबर जमा करावा लागेल. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या एचआरचा दावा केल्यास घरमालकाचा पॅन असणे अत्यंत गरजेचे आहे.

मेडिक्लेमशी संबंधित कागदपत्रे
दरवर्षी २५ हजार रुपयांच्या वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर करसवलतीचा लाभ मिळतो. तुमच्याकडेही मेडिकल किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर २५ हजार रुपयांच्या वार्षिक प्रिमियम लायबिलिटीवर करसवलत मिळू शकते. पण त्यासाठी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून प्रिमियम पेमेंट स्टेटमेंट घेणं आवश्यक आहे कारण ते कंपनीत जमा करावं लागतं. या कागदपत्रांच्या आधारे तुमच्यावर करदायित्व निश्चित केले जाईल. ज्यानंतर कंपनी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ ए जारी करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tax Saving Documents Proof need to be submitted to employer check details on 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Tax Saving Documents Proof(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x