3 May 2024 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Shriram Asset Management Share Price | भारीच शेअर! फक्त 3 दिवसात 73% परतावा दिला, आज 10% वाढला, स्टॉक खरेदीसाठी गर्दी

Shriram Asset Management Share Price

Shriram Asset Management Share Price | श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये सलग तीन दिवस अप्पर सर्किट लागत आहे. काल बुधवारी शेअर बाजारात पडझड असताना ही या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 191.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ चा शेअर बीएसई इंडेक्सवर तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये 191.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 60,126 अंकावर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)

शेअर्समध्ये अद्भूत तेजी :
मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या ‘श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन दिवसांत 106 रुपये वरून 191 रुपये किमतीवर पोहचले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने व्यवस्थापन स्तरावर काही बदल केले आहेत. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ‘कार्तिक जैन’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
श्रीराम एएमसी ही श्रीराम बिझनेस ग्रुपचा एक भाग म्हणून काम करत आहे. ही कंपनी सध्या 2.25 ट्रिलियन रुपये पेक्षा अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीने अमेरिकेतील ‘मिशन 1 इन्व्हेस्टमेंट्स एलएलसी’ ला 23 टक्के भाग भांडवल विकल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू केले. कंपनीने माहिती दिली की, जैन यांची एमडी आणि सीईओ पदी नियुक्ती केल्याने कंपनीच्या ग्राहक धोरणाला नवीन दिशा मिळेल आणि कंपनीची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shriram Asset Management Share Price 531359 in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x