12 December 2024 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Share Trading Tips | शेअर मार्केट गुंतवणूक करायची आहे? दरमहा 50 हजार कमवायचे आहे? हे टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा

Share Trading Tips

Share Trading Tips | सध्या झटपट पैसे कमविण्याचा एकमेव आणि सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केट. पटकन पैसे वाढवायचे असेल तर, लोकांच्या मनात सर्वात आधी शेअर मार्केटचा विचार येतो, मात्र जास्त माहिती नसल्यामुळे लोक त्यात गुंतवणूक करण्यास घाबरतात. शेअर बाजार ही वेगवेगळ्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री आणि गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे. ही इतकी खोल विहीर आहे, ज्यांतून तुम्ही दररोज अप्रतिम कमाई करू शकता. तथापि तुमची कमाई तुमचे एकूण गुंतवणुकीचे प्रमाण आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर आधारित असते. दुसरीकडे, आज या लेखात आम्ही तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करण्याचे काही टिप्स देणार आहोत. या टीप्स फॉलो करून तुम्ही दरमहा 50 हजार रुपये सहज कमवू शकता.

गुंतवणुकीचे टार्गेट निश्चित करा
शेअर बाजारात लोभ आणि लालच हा अत्यंत वाईट दुर्गुण मानला जातो. लोभामुळे अनेकदा लोक शेअर मार्केटमध्ये आपले नुकसान करून घेतात. लोभामुळे अनेकवेळा लोकांना फायद्याचे सौद्यात ही तोटा होतो. मात्र, हा हुशार ट्रेडर हा तोटा कमी करून शेअर बाजारातून चांगला पैसा कमवू शकतो. या साठी गुंतवणूक करताना नेहमी आपले लक्ष निर्धारित करा.

दरमहा कमाई करता येते
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून दर महिन्याला ठराविक रक्कम कमवू इच्छित असाल तर तुम्हाला आधी शेअर बाजारा बद्दल मूलभूत गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. एका महिन्यातील शनिवार-रविवार सोडले तर शेअर बाजारात 22 दिवस खरेदी-विक्री व्यवहार होतात. दुसरीकडे, दोन-तीन दिवस इतर सुट्ट्या मोजल्या तर शेअर बाजारात व्यवसाय करण्यासाठी एका महिन्यात जेमतेम 20 दिवस मिळतात. तर या 20 दिवसात तुम्ही किती रुपयेचे लक्ष निश्चित करून गुंतवणूक करू शकता हे आधीच ठरवा.

सरासरी कमाईचे टार्गेट
शेअर बाजारातून एका महिन्यात 50 हजार रुपये कमवायचे असतील, तर प्रत्येक ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला 2500 रुपये नफा कमवावा लागेल. बाजारातून पैसे कमावणे रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला स्टॉक मार्केटचे मूलभूत नियम आणि ट्रिक माहीत पाहिजे. पैसे गुंतवणूक केल्यावर संयम राखल्यास तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.

टार्गेट कसे साध्य करावे?
जर तुम्ही स्टॉक मार्केट ट्रेडिंग करत असाल, आणि 2500 रुपये रोज हे कमाईचे टार्गेट निश्चित केले तर जास्त लोभ न करता टारगेट हिट झाल्यास प्रॉफिट बुक करत राहा. तुम्ही दररोज संयम राखून ट्रेडिंग सुरू केली, आणि मनात कोणतेही लोभ येऊ दिले नाही, तर तुम्ही सहज चांगली कमाई करु शकता. स्टॉक मार्केटमध्ये संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, हे दोन गुण तुमच्यात असतील तर तुम्ही 50000 ची कमाई सहज करू शकता.

गुंतवणूक रक्कम आणि शेअर्सचे योगदान
दररोज 2500 रुपये कमावण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक रक्कम हवी आहे, याचा विचार आधीच करून ठेवा. आपण कोणत्या स्टॉकमध्ये आणि किती रकम लावून ट्रेडिंग करणार आहोत, आणि टारगेट किंमत हिट झाल्यास आपल्याला किती नफा होईल, याची गणना आधीच करून ट्रेडिंग करा. गुंतवणूक करताना नेहमी स्टॉप लॉस ठेवा आणि टारगेट हिट झाल्यास प्रॉफिट बुक करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Share Trading Tips for investors to Invest in Stock Market check details on 15 January 2023.

हॅशटॅग्स

Share Trading Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x