6 May 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

बाजार थांबेना; गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन

Goa chief minister, Manohar Parrikar

पणजी : गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकूण तीन आमदार आहेत त्यापैकी मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांना पत्र लिहून पक्षच भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. त्यांनी रात्री पावणे दोनच्या सुमारास हे पत्र दिले आणि आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

या २ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. या पत्रावर भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांची स्वाक्षरी नाही आहे. त्यामुळे त्यांची खुर्ची धोक्यात असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. पण सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या ढवळीकरांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x