17 June 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Hindenburg Report on Adani Group | अदाणी ग्रुपच्या शेअर्सपासून लांब राहा, गेम स्टार्ट नाऊ, हिंडेनबर्ग रिसर्चवर जगभरात विश्वास

Hindenburg Report on Adani Group

Hindenburg Report on Adani Group | गौतम अदानी यावर्षी जगातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती बनतील अशी अपेक्षा होती आणि आता त्यांना टॉप-10 च्या यादीत राहणे कठीण जात आहे. अदानी समूहाचे शेअर्स इतके घसरले की अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरले. एका दिवसात अदानीयांची संपत्ती 20.8 अब्ज डॉलरने घसरून 92.7 अब्ज डॉलरवर आली आहे. या अहवालाची काळी छाया सोमवारी अदानी समूहाच्या शेअर्सवर पडली तर गौतम अदानी जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीतून लवकरच बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त होतोय.

विशेष म्हणजे सत्य बाहेर आल्यास अदानी ग्रुपचे शेअर्स ८५ टक्क्याने कोसळतील असं देखील हिंडेनबर्गने अहवालात म्हटल्याने सर्व अर्थ विश्व हादरलं आहे. विशेष हिंडेनबर्ग रिसर्च फर्मची जगभरात विश्वासार्था असल्याने प्रचंड धाकधूक वाढली. हा रिपोर्ट केवळ २-४ दिवसात नव्हे तर तब्बल २ वर्ष भारतासहित जगभरातील कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने लेखी स्वरूपात केलेल्या ८८ प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देण्याची हिम्मत दाखवलेली आंही, तसेच हिंडेनबर्गने थेट तुम्ही आमच्या विरोधात अमेरिकन कोर्टात खटला दाखल कराच असं प्रति आव्हान केल्याने अदानी ग्रुपमध्ये धास्ती वाढल्याचं म्हटलं जातंय.

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये अदानी सातव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर लॅरी पेज आठव्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ९२ अब्ज डॉलर आहे. नवव्या स्थानावर श्वा वॉल्मर आहे. त्यांची संपत्ती 88.7 अब्ज डॉलर आहे. सोमवारी अदानी समूहाचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरला तर गौतम अदानीयांची संपत्ती सुमारे ८८ अब्ज डॉलरवर येईल. अशा तऱ्हेने तो दहाव्या क्रमांकावर येईल किंवा टॉप-१० मधूनही बाहेर पडेल. कारण, दहाव्या क्रमांकावर असलेल्या सर्गेई ब्रिनची संपत्तीही ८८.४ अब्ज डॉलर आहे.

गेल्या वर्षी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली होती. त्यावर्षी कमाईतही अदानी पहिल्या क्रमांकावर होते. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर घसरले आहेत. आता त्यांची संपत्ती 81.3 अब्ज डॉलर इतकी आहे.

या वर्षी संपत्ती गमावण्याच्या बाबतीत टॉप 3 अब्जाधीश भारतीय
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी या वर्षी संपत्ती गमावण्याच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी आतापर्यंत 27.9 अब्ज डॉलर्स गमावले आहेत. त्याखालोखाल रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. या वर्षी अंबानींना आतापर्यंत ५.७७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आहेत. त्यांचे २.१२ अब्ज डॉलरचे नुकसान झाले.

गेल्या वर्षीचे टॉप लूजर्स यावर्षीचे टॉप गेनर्स
गेल्या वर्षी संपत्ती कमी करण्यात एलन मस्क अव्वल स्थानी होते. या वर्षी आतापर्यंत तो कमाईत पहिल्या क्रमांकावर आहे. अदानींनी गमावलेल्या रकमेपेक्षा मस्क यांनी जास्त कमाई केली आहे. एलन मस्क यांच्या संपत्तीत २९.९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर अदानी यांच्या संपत्तीत २७.९ अब्ज डॉलरची घट झाली आहे. इतकंच नाही तर जेफ बेजोस यांनी या वर्षी आतापर्यंत आपल्या संपत्तीत 27.8 अब्ज डॉलरची वाढ केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hindenburg Report on Adani Group effect on Adani group shares check details on 29 January 2023.

हॅशटॅग्स

#Hindenburg Report on Adani Group(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x