14 December 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरणीनंतर तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदी आणि परकीय भांडवलाचे निर्गमन या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूक बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी स्टॉकने 71.75 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीला स्पर्श केला होता. आता हा स्टॉक उच्चांक किमतीवरून किंचित खाली ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 69.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक टेक्निकल चार्टवर नवीन ब्रेकआउट देण्याची तयारी करत आहे. या शेअरला खालच्या पातळीवर मजबूत सपोर्ट मिळत आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये पैसे लावताना 65 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. हा स्टॉक 72 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआउट देऊ शकतो.

जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ नफा तिप्पट वाढून 302 कोटी रुपयेवर पोहोचला होता. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 101 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून 2024 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 2,016 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीत कंपनीने 1,348 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार सध्या 3.8 GW आहे. 30 जूनपर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 1,197 कोटी रुपये निव्वळ रोकड होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x