
Gold Price Today | अर्थसंकल्पानंतर सराफा बाजाराला पंख लागले असून सोने-चांदीची जोरदार खरेदी होत आहे. यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. सोन्याने 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी टप्पा गाठला आहे, तर चांदीचा भाव देखील 71,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. आज जागतिक बाजारात ही सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
गुरुवारी सकाळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 58,825 रुपयांवर उघडला होता, परंतु काही काळानंतर दरात काहीशी घसरण दिसू लागली. मात्र, तो अजूनही मागील बंद किमतीच्या तुलनेत १.२९ टक्क्यांनी वधारला आहे.
चांदीची चमकही वाढली
सोन्याच्या धर्तीवर चांदीच्या दरातही आज तेजी पाहायला मिळत आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 1,499 रुपयांनी वाढून 71,340 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 70 हजारांवर खुला झाला होता, परंतु व्यवहार सुरू होताच गुंतवणूकदारांनी खरेदीवर कंबर कसली आणि चांदीच्या दरात मागील बंद दरापेक्षा 2.15 टक्क्यांनी वाढ झाली.
सोन्याचे भवितव्य काय?
कमोडिटी एक्स्पर्ट आणि केडिया अॅडव्हायझरी तज्ज्ञांच्या मते, यावर्षी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सोने ही खरेदीदारांची पहिली पसंती बनली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणीही वाढली असून त्याची खरेदी काही काळ पाहायला मिळणार आहे. पहिल्या सहामाहीतच सोन्याचा भाव ६० हजारांच्या पुढे जाईल, असे दिसते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.