19 May 2024 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

PC Jeweller Share Price | चार बँकांनी पीसी ज्वेलर कंपनीला नोटीस का पाठवली? शेअर्सवर नेमका काय परिणाम होणार?

PC Jeweller Share Price

PC Jeweller Share Price | सराफा क्षेत्रातील प्रसिद्ध नाव, ‘पीसी ज्वेलर्स लिमिटेड’ या अग्रगण्य कंपनीला चार बँकांनी कर्ज परतफेडीच्या नोटिसा धाडल्या आहेत. पीसी ज्वेलर्स लिमिटेड कंपनीला IDBI बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, करूर व्यासा, या चार बँकांनी कर्ज दिले होते. आता या बँकानी सक्तीने कर्ज वसुली सुरू केली असून, त्यांनी पीसी ज्वेलर्स लिमिटेड कंपनीला नोटीस पाठवणे सुरू केले आहेत. याशिवाय पीसी ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आधीच SBI सोबत कायदेशीर लढाईला तोंड देत आहे. त्याचा नकारात्मक परिणाम शेअर्सच्या किमतीवर ही पाहायला मिळाला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 37.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PC Jeweller Share Price | PC Jeweller Stock Price | BSE 534809 | NSE PCJEWELLER)

SBI सोबतच्या कायदेशीर लढाई :
पीसी ज्वेलर्स लिमिटेड कंपनी स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, लीड बैंक SBI सोबत त्यांची कायदेशीर लढाई सुरू असून 7 फेब्रुवारी 2023 रोजी डेट रिकव्हरी अपील ट्रिब्यूनलमध्ये त्यावर सुनावणी घेण्यात आली होती. या प्रकरणावर न्यायालय पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी 2023 रोजी करणार आहे. ‘पीसी ज्वेलर’ कंपनीच्या म्हणण्यानुसार SBI व्यतिरिक्त कन्सोर्टियमच्या इतर चार बँका म्हणजे आयडीबीआय बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, करूर व्यास बँक, यांनी देखील कर्जवसूलीसाठी नोटिस जारी केल्या आहेत.

पीसी ज्वेलर्स डिफॉल्टर :
‘पीसी ज्वेलर्स लिमिटेड’ कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर 2022 सेबीला कळवले की, जुलै-सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेटलेले 3466.28 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यास ते असक्षम आहेत. म्हणजेच कंपनी या थकित कर्जाची परतफेड करू शकत नाही. कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, दुसऱ्या तिमाहीच्या जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध वार्षिक अहवालानुसार कंपनीने SBI, PNB, Union Bank of India, Axis Bank, Kotak Mahindra Bank, IndusInd Bank, यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. आणि आता कंपनीने कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवली केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PC Jeweller Share Price 534809 PCJEWELLER stock market live on 08 February 2023.

हॅशटॅग्स

PC Jeweller Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x