3 May 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Jhunjhunwala Portfolio Shares | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील 2 स्टॉक तेजीत, कमाईची संधी, स्टॉक डिटेल्स पहा

Jhunjhunwala Portfolio Shares

Jhunjhunwala Portfolio Shares | शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणुकदार दिग्गज लोकांचे पोर्टफोलिओ फॉलो करत असतात. अनेक लोक दिवंगत गुंतवणुकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांना आपला आदर्श मानतात. आणि ते त्यांच्या पोर्टफोलिओबाबत जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. सध्या ‘राकेश झुनझुनवाला’ यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला हाताळत आहेत. डिसेंबर तिमाही निकालानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमधील 2 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. हे शेअर्स आहेत, ‘स्टार हेल्थ’ आणि ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Health & Allied Insurance Company Share Price | Star Health & Allied Insurance Company Stock Price | Indian Hotels Company Share Price | Indian Hotels Company Share Price | Jhunjhunwala Portfolio)

स्टार हेल्थ :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स 650 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या किंमतीवर खरेदी केल्यास तुम्हाला 27 टक्के नफा होईल. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, स्टार हेल्थ कंपनीची बाजारात मजबूत पकड असून त्यांच्या कडे मोठा वाटा आहे, आणि कंपनीचे आरोग्य विमा उद्योगातील कार्यप्रदर्शनही जबरदस्त राहिले आहेत. स्टार हेल्थ कंपनीचा आरोग्य विम्यामध्ये 33 टक्के वाटा आहे. स्टार हेल्थ कंपनीच्या 830 शाखा आणि 14000 हून अधिक नेटवर्क रुग्णालये आहेत. त्याचे कामकाज एकूण 25 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालते.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीचा GWP 14.5 टक्के YoY ने वाढून 3096 कोटीवर गेला आहे. तर NWP 15.1 टक्के आणि NEP 13.4 टक्क्यांनी वाढला आहे. विमा दाव्याचे प्रमाण 68 टक्क्यांवरून 63.7 टक्क्यांवर घसरले आहेत. एकत्रित गुणोत्तर 94.8 टक्के आहे तर कंपनीने 126 कोटी रुपये अंडररायटिंग नफा कमावला आहे. कंपनीने 210 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 578 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

इंडियन हॉटेल्स :
ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी इंडियन हॉटेल्स स्टॉकवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सध्याच्या किंमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला 27 टक्के नफा मिळू शकतो. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरून असे समजते की, हॉटेल व्यवसाय क्षेत्रात चांगली तेजी आली असून ती टिकुन राहील. ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीने आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या 9 महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली होती. या कंपनीचे शेअर्स लवकरच वाढ प्री-कोविड पातळी स्पर्श करतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

अॅसेट लाइट व्यवसाय मॉडेलवर लक्ष केंद्रित केल्याने इंडियन हॉटेल्स कंपनीला पर्यटन क्षेत्रात चांगला फायदा मिळू शकतो. अपेक्षेपेक्षा उत्तम तिमाही निकाल जाहीर केल्याने ब्रोकरेज फर्मने कंपनीचा FY23/FY24/FY25 महसूल आणि EBITDA अंदाज अनुक्रमे 4.8%, 4.8%, 4.7% आणि 13.6%, 14.1%, 14.4% पर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कंपनीने या तिमाहीत 1686 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो अपेक्षेपेक्षा खूप चांगला मानला जात आहे. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 51 टक्के आणि तिमाही आधारावर 22.8 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा EBITDA 597 कोटी होता, जो वार्षिक आधारावर 85.6 टक्के होता, तर तिमाही आधारावर 57 टक्के होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jhunjhunwala Portfolio Shares stock market live on 08 February 2023.

हॅशटॅग्स

Jhunjhunwala Portfolio Shares(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x