
KCD Industries India Share Price | शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करून संयम राखणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट यासारख्या गोष्टींचा फायदा मिळत असतो. ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअरधारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनी आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेत आहे. मागील 6 महिन्यांत ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 96.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KCD Industries India Share Price | KCD Industries India Stock Price | BSE 540696)
स्टॉक स्प्लिटची रिकॉर्ड डेट :
‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की,” नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी 1 शेअर 5 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. स्टॉक विभाजित झाल्यावर या कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 5 रुपयांवरून 1 रुपयांवर येईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 17 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.
गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा :
2023 या नवीन वर्षात ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10.21 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि मागील सहा महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 81.65 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने लोकांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘केसीडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 110.75 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 36.90 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 17.42 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.