18 May 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Mutual Fund SIP | 10 वर्षात 50 लाख रुपये हवे आहेत का? म्युच्युअल फंड SIP गुंतवणूकीचं गणित समजून घ्या

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युचुअल फंड मार्केटमध्ये ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच एसआयपी गुंतवणूकीचा लोकप्रिय मार्ग मानला जातो. म्युच्युअल फंडामध्ये SIP पद्धतीने ठराविक कालावधीनुसार एक रक्कम जमा करता येते. तुम्ही एकरकमी गुंतवणुक करण्याऐवजी महिन्यातून एकदा किंवा तिमाही आधारे पैसे जमा करू शकता. एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मध्यम किंवा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी रक्कम बचत करण्याची संधी मिळते. मुलाचे शिक्षण, सुट्ट्या, सेवानिवृत्ती ची प्लॅनिंग करून तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी द्वारे म्युचुअल फंड छोटी रक्कम जमा करून तुम्ही चांगला पेटवा कमवू शकता. आज या लेखात आपण म्युचुअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करून 10 वर्षांत 50 लाख रुपये कसे जमा करू शकतो, हे जाणून घेणार आहोत.

म्युचुअल फंड SIP बाबत तज्ञांचे मत :
गुंतवणूक तज्ञ नेहमी वाढत्या उत्पन्नात म्युचुअल फंड गुंतवणूक वाढवण्याचा सला देतात. यासाठी तुम्ही वार्षिक आधारावर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढवू शकता. 10 वर्षांत 50 लाख रुपयांचा निधी तयार करणे हे थोडेसे अवघड आहे, मात्र शक्य आहे. गुंतवणूक करून पैसे कमावण्यासाठी योग्य शिस्त आणि संयम आवश्यक आहे. गुंतवणूकदारानी दरवर्षी हर एसआयपी गुंतवणूक रक्कम वाढवली, तर ते दीर्घ काळात मोठा परतावा कमवू शकतात.

गुंतवणुकीवर परतावा :
म्युच्युअल फंडामध्ये 10 वर्ष एसआयपी पद्धतीने द्वारे गुंतवणूक केल्यास सरासरी वार्षिक 12-15 टक्के परतावा मिळतो. म्हणून दीर्घ काळात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करून जबरदस्त परतावा कमावता येतो.

गुंतवणूक रक्कम आणि वार्षिक वाढ :
समजा जर तुम्ही 15 टक्के वार्षिक स्टेप-अप करत असला, म्हणजे दर वर्षी मासिक एसआयपी रक्कम 15 टक्के वाढवत असाल, आणि तुम्हाला 12% परतावा अपेक्षित असेल तर तुम्ही 10 वर्षांत 50 लाख रुपये सहज कमवू शकता. या प्रकरणात, तुम्हाला दरमहा 12,500 रुपये एसआयपी गुंतवणूक करावी लागेल. आणि त्यात दर महा 15 टक्के वाढ करावी लागेल.

योग्य म्युचुअल फंड कसा निवडावा?
नेहमी म्युचुअल फंड निवडण्यापूर्वी तुमचे दीर्घकालीन लक्ष निर्धारित करा. तुमच्या आर्थिक योजना किंवा लक्ष्य पूर्ण करण्याची क्षमता त्या योजनेत आहे की नाही, हे तपासा. परतावा, जोखीम, तरलता आणि कर, या बाबतीत तुमच्या फंड सर्वोत्तम आहे की नाही, हे पहा. असावा. दर वार्षिक सरासरी परतावा वाढता असावा. हे सर्व गुण तपासून म्युचुअल फंडमध्ये पैसे लावावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund SIP scheme for good return on investment details on 10 February 2023.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x