14 December 2024 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Netlinks Share Price | मालामाल शेअर, गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड, रेकॉर्ड डेट पाहा

Netlinks Share Price

Netlinks Share Price | ‘नेटलिंक्स लिमिटेड’ या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर सोमवारपासून ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी नेटलिंक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 227.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Netlink solutions (India) ltd takeover)

‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने निर्धारित केलेल्या रेकॉर्ड तारखेला इक्विटी शेअर्स धारण करणाऱ्या सर्व शेअर धारकांना कंपनी बोनस शेअर्स वाटप करेल. अद्याप कंपनीकडून रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी 17 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. 1 मार्च 2023 रोजी ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 272 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 30 जून 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने 53.50 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 248.01 कोटी रुपये आहे.

स्टॉक परफॉर्मन्स :
‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 1 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने मागील 3 महिन्यांत 163 टक्के, 6 महिन्यांत 161 टक्के आणि मागील 1 वर्षात 158 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात लोकांना 822 टक्के परतावा कमावून दिला आहे. नेटलिंक्स ही इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. कंपनीने 1999. साली आपली इंटरनेट सेवा सुरू केली होती. नेटलिंक्स कंपनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील उद्योगांना अत्याधुनिक व्यवस्थापित नेटवर्क सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Netlinks Share Price check details on 08 March 2023.

हॅशटॅग्स

Netlinks Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x