
Vodafone Idea Share Price | ‘व्होडाफोन आयडिया’ या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7,990 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. 2021-22 च्या याच तिमाहीमध्ये ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला 7,234.1 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
महसूल वाढ :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 9.29 टक्क्यांच्या वाढीसह 10,620.6 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 9,717.3 कोटी रुपये होते. डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये कंपनीची प्रति ग्राहक सरासरी कमाई वार्षिक 17.4 टक्क्यांच्या वाढीसह 135 रुपयेवर पोहचली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीकडे 22.86 कोटी ग्राहक होते. तर सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीतकंपंचीच्या ग्राहकांची संख्या 23.44 कोटी होती.
तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के घसरणीसह 7.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.30 रुपये प्रति शेअर होती.
व्होडाफोन आयडिया कंपनीने एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे की, “14 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘युरो पॅसिफिक सिक्युरिटीज लिमिटेड’ फर्मला 10.20 रुपये प्रति शेअर या किमतीवर 42,76,56,421 शेअर्स जारी करण्याचे मान्य करण्यात आले. वॉरंट धारकांनी शेअर इश्यूसाठी 436.20 कोटी रुपये पेमेंट केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.