5 May 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Penny Stock | पेनी शेअर! अल्पावधीत 150 टक्के परतावा दिला, 28 रुपयाचा KCP शुगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी

Penny Stock

Penny Stock | KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 6 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 11 रुपये या आपल्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 29 रुपये किमतीवर पोहचला आहे. KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. (KCP Sugar Share Price)

मागील काही वर्षांत KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 900 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता जा स्टॉक 29 रुपये किमतीवर पोहचला आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 28.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज कंपनीचे 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 तिमाहीमधील उत्कृष्ट आर्थिक कामगिरी आणि निकालांमुळे केसीपी शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. KCP शुगर कंपनीने जून तिमाहीत 30 टक्के वाढीसह 96 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. KCP शुगर कंपनीचा EBITDA तब्बल 1958 टक्क्यांनी वाढला असून 38 कोटीपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. कंपनीचा जून तिमाहीमध्ये PAT 2245 टक्क्यांच्या वाढीसह 30.68 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः साखर उत्पादन आणि विक्री संबंधित व्यवसाय करते. यासोबतच केसीपी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी रेक्टिफाइड स्पिरिट, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, इथेनॉल, इन्सिडेंटल कोजनरेशन ऑफ पॉवर इत्यादी उत्पादने देखील घेते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 330 कोटी रुपये आहे.

मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के नफा कमावून दिला आहे. केसीपी शुगर कंपनीच्या ऑपरेशनल उत्पन्नात 10 टक्के घसरण झाली आहे. कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्न 319 कोटी रुपयेवरून घसरून 289 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of KCP Sugar and Industries Corp share price on 22 July 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x