
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने परतावा कमावून देत असत. असाच एक स्टॉक आहे, ‘नजारा टेक्नॉलॉजी’. तज्ञांनी या स्टॉकमध्ये संधी मिळेल तेव्हा खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 350 रुपये वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
नजारा टेक शेअर किमतीचा इतिहास :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ या कंपनीने आपला IPO 1,101 रुपये प्रति शेअर हा किमतीवर लाँच केला होता. आणि शेअरची लिस्टिंग 81 टक्के प्रीमियम किमतीवर झाली होती. या कंपनीचे शेअर्स 1,971 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. नंतर स्टॉक 84 टक्क्यांनी वाढून 2,026.90 रुपयेवर पोहचला होता. स्टॉक स्प्लिटनंतर मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत 17 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 550.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
खरेदी,विक्री की होल्ड? :
शेअर बाजारातील एकूण 9 पैकी 9 तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकसाठी 898 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. पुढील वर्षभरात हा स्टॉक 898 रुपये किमतीवर पोहचले असे तज्ञांना वाटते. 515 रुपयांवर स्टॉप लॉस लावून तुम्ही हा स्टॉक बिनधास्त खरेदी करू शकता असे तज्ञ म्हणाले.
कंपनीबद्दल थोडक्यात :
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सामील आहेत. विश्वचषक क्रिकेट, छोटा भीम आणि मोटू पतलू कार्टून मालिकेची निर्मिती करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. नजारा टेक कंपनी भारत, आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व सह विविध 60 देशांमध्ये उद्योग करते. या कंपनीचे सुरुवात 2000 साली झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.