12 December 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

EFC Share Price| 1 वर्षात 650 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, बातमी येताच खरेदीला ऑनलाईन गर्दी

EFC Share Price

EFC Share Price | EFC लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ मिळवून देणार आहे. ही घोषणा करताच मंगळवारी 8 ऑगस्ट 2023 रोजी EFC लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 4.29 टक्क्यांची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती आणि शेअरची किंमत 1,105.70 रुपये किमतीवर पोहचली होती. EFC लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 854.42 कोटी रुपये होते. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी EFC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के घसरणीसह 1,050.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

5 ऑगस्ट 2023 रोजी EFC लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्प्लिट अंतर्गत EFC लिमिटेड कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. या स्टॉक स्प्लिट नंतर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. स्टॉक स्प्लिटसाठी EFC लिमिटेड कंपनीने 18 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

नुकताच EFC लिमिटेड कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाहीत EFC लिमिटेड कंपनीने आपल्या वार्षिक ऑपरेशनल महसूलमध्ये 14005 टक्के वाढ साध्य केली आहे. मागील वर्षी कंपनीने 0.40 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, तर जून 2023 तिमाहीत कंपनीने 56.42 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 29.13 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचा जून तिमाहीतील ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन प्रमाण 51.63 टक्के नोंदवले गेले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत EFC लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 1120 टक्क्यांच्या वाढीसह 3.18 कोटी रुपयेवर पोहचला आहे. तर कंपनीचा कॅपिटल एम्प्लॉइड ऑन रिटर्न 11 टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी दर 10.5 टक्केवर पोहचला आहे. EFC लिमिटेड कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात EFC लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 228 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 650 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात EFC लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1690 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EFC Share Price today on 10 August 2023.

हॅशटॅग्स

EFC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x