
TTML Share Price | शेअर बाजारात सुरू असलेल्या गोंधळामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स कमजोर झाले आहेत. शेअर बाजारातील या चढ-उतारमुळे ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्येही जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के घसरणीसह 55.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकची वार्षिक नीचांक किंमत 52.60 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
टीटीएमएल शेअर 82 टक्के स्वस्त :
सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टीटीएमएल कंपनीचा स्टॉक घसरला होता. स्टॉक सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. त्याच वेळी जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 290 रुपयांपर्यंत गेली होती, जी त्याची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी होती. सध्या टाटा समूहाचा हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीपेक्षा 82 टक्के खाली ट्रेड करत आहे. टीटीएमएल कंपनीचे बाजार भांडल्वा 11,094 कोटी रुपये आहे.
एका वर्षापासून स्टॉक दबावाखाली :
टीटीएमएल कंपनीचा स्टॉक मागील एक वर्षापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. दर वार्षिक आधारावर टीटीएमएल कंपनीचा शेअर 56.29 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 43.45 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याचप्रमाणे मागील तीन महिन्यांत शेअर39.80 टक्क्यांनी तर गेल्या एका महिन्यात स्टॉक 29.42 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. गेल्या तीन वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकने लोकांना 1721.65 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला होता. तर टीटीएमएल स्टॉक मागील दोन वर्षांच्या कालावधीत 240.46 टक्क्यांनी वाढला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.